आषाढी स्पेशल- "पंढरीचे वारकरी" छत्रपती संभाजीनगर हून उद्धव भयवाळ यांनी न्यूज मसाला कडे पाठविलेली रचना !

आषाढी स्पेशल- "पंढरीचे वारकरी" छत्रपती संभाजीनगर हून उद्धव भयवाळ यांनी न्यूज मसाला कडे पाठविलेली रचना !

   
            !! पंढरीचे वारकरी !!

पांडुरंगाच्या भेटीसाठी
आम्ही चाललो पंढरपुरी !
पंढरीचे वारकरी हो  
पंढरीचे वारकरी !!

विठूनामाच्या गजरामध्ये
तहान भूक ही हरवली !
विठ्ठलाच्या दर्शनाची
आस आता हो लागली !!

चंद्रभागेच्या तीरावरी
जमेल भक्तांचा मेळा !
इच्छापूर्ती होईल, जेव्हा
दर्शन देईल विठू सावळा !!

पंढरपूरच्या वारीची
किती वर्णावी महती !
विठुरायाच्या दर्शनाने
चिंता संसाराच्या मिटती !!

 उद्धव भयवाळ
छत्रपती संभाजीनगर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !