योगासने व राजयोग यांच्या द्वारे तन व मन यांचे आरोग्य सुधृढ राहते-ब्रह्मकुमारी वासंती दिदीजी

योगासने व राजयोग यांच्या द्वारे तन व मन यांचे आरोग्य सुधृढ राहते-ब्रह्मकुमारी वासंती दिदीजी

     नासिक(सुचेता बच्छाव)::- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, गंगापूर रोड शाखेतर्फे वृंदावन लॉन्स येथे संगीतमय योगा व मेडीटेशनचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. सेंटर च्या संचालिका आदरणीय मनीषा दिदि यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सेंटरचे साधक भाई-बहनजी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ. स्वाती भामरे, संगीतमय योगाचे प्रणेते डॉ. उज्ज्वल कापडणीस, त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मनीषा कापडणीस, सेन्टरच्या ब्रह्मकुमारी प्रिया बहन आणि आशाताई शिंदे यांनी अनमोल सहकार्य केले. वासंती दीदी, ब्रह्मकुमारीज् संस्थेच्या नाशिक जिल्हा प्रमुख या मुख्य पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याग, तपस्या, सेवा आणि मार्गदर्शन करणे हा दिदिंचा स्थायीभाव आहे.

राजयोगिनी वासंती दिदि यांचा परिचय मनीषा दिदि यांनी करून दिला. डॉ. कापडणीस पती-पत्नींनी संगीतमय योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यामध्ये ४०० स्री पुरुष नागरिकांनी सहभाग घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून संगीतमय योगाचा अनेक नागरिक लाभ घेत आहेत. डॉ. कापडणीस यांनी आरोग्यासाठी होणारे फायदे सांगितले. ते २०१७ पासून संगीतमय योगाचा स्वत: अभ्यास करून लोकांसाठी निःशुल्क सेवा देत आहेत. या उपक्रमामुळे आम्हाला आजारांपासून मुक्ती मिळत आहे असे मत नागरिकांनी कार्यक्रमात व्यक्त केले. वासंती दिदि यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की संगीतमय योगा व राजयोग यांचा सुवर्णमध्य घडवून 

शरीर व आत्मा सुधृढ बनवू शकतो. योगा केल्यामुळे आपणांस अनेक फायदे होतात यासाठी  दैनंदिन जीवनात या साधनेचा समावेश करावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना  केले. विश्व कल्याणासाठी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करावा या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेचे त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच ब्रह्मकुमारी संस्थेशी निगडीत असलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतात हे त्यांनी आवर्जून नमूद केले. माजी नगरसेविका सौ. स्वाती भामरे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या  की ब्रह्मकुमारी संस्था डॉ. कापडणीस यांच्या सहकायायने निःशुल्क संगीतमय योगा व मेडीटेशन या सारखे उपक्रम राबवतात हे कौतुकास्पद आहे. त्या स्वत: देखील योगाचा लाभ घेत आहेत हे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्जवलनाने  झाली. ब्रह्मकुमारी मनीषा दिदि यांनी उत्कृष्ट सूत्र संचालन केले. तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. नेहा कोठावदे यांनी गीतगायन केले. सोनी तरवे व कुमारी सहर्षा निकम यांनी स्वागत नृत्य सादर केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल