महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
महिला शिक्षणाधिकारी व लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक::- जिल्हा परिषद नासिक च्या माजी शिक्षणाधिकारी (प्र), तथा महापालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि मनपा शिक्षण विभागाचा लिपिक नितीन जोशी यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
निलंबित असलेल्या मुख्याध्यापकास पुन्हा रूजू करून घेण्यासाठी लाच मागण्यात आली होती, सदर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला असता विभागाच्या वतीने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघे सापडले आहेत. अधिक चौकशीसाठी धनगर व जोशी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यातील लिपिक जोशीने ५ हजार रुपये तर ४५ हजार रुपये शिक्षणाधिकारी धनगर यांनी स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा