'निसर्गस्पर्श' चित्रप्रदर्शनाचे रविवारी उदघाट्न !
'निसर्गस्पर्श' चित्रप्रदर्शनाचे रविवारी उदघाट्न !
नाशिक ( प्रतिनिधी ) - अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कलाशिक्षक असलेल्या चित्रकार संतोष कर्डक यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ' निसर्गस्पर्श ' या जलरंगातील प्रदर्शनाचे उदघाट्न रविवारी ( दि.१८ ) सायंकाळी ५ वाजता नाशिकरोडच्या पु. ना. गाडगीळ कलादालनात होईल. उदघाट्क म्हणून ज्येष्ठ चित्रकार प्रा. संजय साबळे उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. किरण लहामटे, मुख्याध्यापक सुभाष चासकर, संगमनेरचे उद्योजक कैलास शेळके, राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. सुधाकर जगताप उपस्थित राहतील. संतोष कर्डक यांनी आर्ट टीचर्स डिप्लोमा, आर्ट मास्टर व इंटेरिअर डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. अकोले तालुक्यातील साकिरवाडी येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात कलाशिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांना कलेचे मार्गदर्शन करतात.
आपली नोकरी सांभाळून त्यांची सातत्याने कलासाधना सुरु असते. जलरंग हे त्यांचे आवडते रंगमाध्यम असून निसर्गदृश्ये रंगवण्यात ते रंगून जातात. त्यातीलच अलीकडे रंगवलेली सुमारे ५० चित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. दि. ३० जूनपर्यंत हे निसर्गस्पर्श प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३० पर्यंत विनामूल्य खुले राहील.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा