प्रवासी वाहतूकीस परवानगी साठी लाच स्वीकारताना आलोसे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

प्रवासी वाहतूकीस परवानगी साठी लाच स्वीकारताना आलोसे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

      नासिक::- शिर्डी शहर वाहतूक शाखेचे पोलिस नाईक आलोसे प्रकाश दशरथ पिलोरे यांनी ३५००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई केली.

    तक्रारदार यांचे तीन वाहनांना नगरसुल ते शिर्डी प्रवासी वाहतुक करू देण्याचे मोबदल्यात आलोसे प्रकाश दशरथ पिलोरे यांनी तक्रारदार यांचे कडे प्रतिमहा ३५००/- रु. लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तकार दिली होती. सदर तक्रारीवरून ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान प्रकाश दशरथ पिलोरे यांनी तक्रारदार यांचेकडे ३५००/- रु. लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दि. १३.०६.२०२३ रोजी शिर्डी पोलीस ठाणेचे समोर स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले असुन त्यांचेविरुद्ध भ्र.प्र.का. सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे. सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधिक्षक ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली विश्वजीत जाधव, पोलीस उपअधिक्षक, सा.प्र.वि. नाशिक यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश..!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।