जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न !
जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न ! नाशिक, दिनांक 30 जून 2023 (जिमाका वृत्तसेवा)::- जिल्हा परिषदे तर्फे शाळा, केंद्र व तालुकास्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली होती. आज महाकवी कालिदास कलामंदिर येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी यांच्यासह जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा झाला सन्मान पहिला ग्रुप दर्शिका नरेश वानखेडे इयत्ता १ ली, जि.प.शाळा, दहिकुटे, मालेगाव गणेश