२००० च्या नोटेमध्ये खरोखर "इलेक्ट्रॉनिक चीप" बसवली होती !

२००० च्या नोटेमध्ये खरोखर "इलेक्ट्रॉनिक चीप" बसवली होती !
    
           ८ नोव्हेंबर २०१६ ला मोदी सरकारच्या काळात ५०० व १००० च्या नोटांवर नोटबंदी जाहीर केली, नोटबंदीचे कुठे स्वागत तर कुठे विरोधही नोंदविला गेला मात्र नोटबंदी झाली. त्यानंतर नवीन ५०० व २००० च्या नोटा चलनात आणल्या गेल्या. तेव्हा २००० च्या नोटेत "इलेक्ट्रॉनिक चीप" बसवलेली असून ही नोट कुणाकडे जात आहे, तिचा प्रवास कसा होत आहे हे सर्व, सरकारला तसेच रिझर्व्ह बँकेला समजणार अशी अफवा पसरवली गेली, ही अफवा फार काळ टिकली नाही, हा विनोदाचा भाग सोडून विचार केला तर आज तोच विनोद सत्यात उतरला आहे असे वाटते.

       २३ मे २०२३ पासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बॅंकांनी वितरीत करु नये. ग्राहकांकडून स्विकारावी जेणेकरून २०१६ प्रमाणे नोटबंदी ठरणार नाही.  पुढे ती नोट चलनात असणारच नाही असे नाही. यावर अनेक जण आता आपापली मतं व्यक्त करतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त करताना या नोटजमाचे स्वागत केले, तसेच सर्वसामान्यांच्या खिशात २००० ची नोट कमी प्रमाणात असते त्यामुळे या नोटजमाचा सर्वसामान्यांना काही फरक पडणार नाही. मात्र ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणात या नोटांचा साठा असेल त्यांच्यासाठी ही घोषणा मोठा मनस्ताप ठरणार हे निश्चित. ३० सप्टेंबर २३ पर्यंत दररोज (बॅंका सुरु असतील तेव्हा) रुपये २००००/- पर्यंत भरणा करु शकतात. अशा प्रकारे भरणा केल्यास अनेक नोटा बॅंकांकडे जमा होतील, सर्व नोटा जमा करणे हे ग्राहकांसाठी एक दिव्यच असणार यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी धडपड सुरू केली जाणार हे या निमित्ताने अधोरेखित होते. भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी परदेशातून होणारा नकली नोटांचा पुरवठाही संपुष्टात येईल याचा फटका भारतविरोधी तत्वांना जोराचा बसेल. 
       २००० रुपयांच्या नोटांचा मर्यादित भरणा जरी बॅंक खात्यात केला तरीही आयकर विभागाची नजर त्या संबंधित खात्यांवर राहणार आणि संबंधितांना त्याची जुळवणी करावी लागणार कदाचित आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. याचा अर्थ ज्यांनी प्रमाणापेक्षा जास्त नोटा गोळा करून ठेवल्यात त्या आता काळजीपूर्वक बाहेर काढाव्या लागतील, किंवा तुकडे तुकडे करुन तिच्यात "इलेक्ट्रॉनिक चीप" शोधत बसावे लागेल ! शोधूनही न सापडणारी  "इलेक्ट्रॉनिक चीप" ही खरोखर तत्कालीन अफवा होती की काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा विनोद होता असा प्रश्न उपस्थित होतोच ना !
      अनेक देशांमध्ये पाच ते दहा वर्षांत असा नोटबंदी वा नोटबदलीचा निर्णय सतत घेतला जातो, असा निर्णय २०१६ पर्यंत भारतात १९७८ वगळता क्वचितच घेण्यात आला आहे. अवघ्या साडेसहा वर्षे वय असलेल्या २००० च्या नोटा जमा करणे हे भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच पूरक ठरेल यात मात्र शंका नाही ! कारण तिच्याच "इलेक्ट्रॉनिक चीप" अशी बसवलेली होती हे आज लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे