अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक::- संगमनेर येथील कंत्राटी अभियंता विकास सुरेश जोंधळे, वय (२८), सिटी लेवल टेक्निकल सेल अभियंता, (कंत्राटी), नेमणूक संगमनेर यांस १७०००/- रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
यातील तक्रारदार यांनी प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत अनुदान मिळणे कामे संगमनेर नगरपरिषद येथे अर्ज दाखल केला होता. मंजूर झालेले अनुदानाची शिफारस करून तक्रारदार यांना अनुदान मिळवून देण्यासाठी आरोपी यांनी तक्रारदाराकडे ४००००/- रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दुसऱ्या हप्त्याच्या २००००/- रुपये लाचेच्या रकमेची तडजोडी अंती १७०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून नमूद लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्या समक्ष आरोपी यांना स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. म्हणून आरोपी यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ह. पंकज पळशीकर, पो.ना. नितीन कराड, पो.ना.प्रकाश महाजन, चापोना/परशुराम जाधव यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा