अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे ६/७ मे रोजी संमेलन !

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे ६/७ मे रोजी संमेलन !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.

    नासिक::- अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ ही संघटना मराठी प्रकाशकांना, लेखकांना आणि वाचकाना विविध उपक्रमांच्या सहाय्याने जोडण्याचे आणि एकत्रित ठेवण्याचे कार्य गेली अनेक वर्षे करीत आहे. लेखन संस्कृती आणि वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रकाशक संघाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रकाशक आणि लेखकांसाठी विविध कार्यशाळा, शिबिरांचे आयोजन तसेच वाचन संस्कृतीच्या प्रसारासाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केले जाते. अशाच विविध उपक्रमांपैकी एक असलेले लेखक प्रकाशक साहित्य संमेलन दरवर्षी घेण्यात येते. यापूर्वी पुस्तकांचे गाव भिलार, चिपळूण आणि सातारा येथे हि संमेलने झालेली आहे. नाशिककरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे या वर्षी हे चौथे संमेलन आयोजित करण्याचा मान आपल्या नाशिक शहराला मिळालेला आहे.


अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ प्रकाशक अशोक कोठावळे मॅजेस्टीक प्रकाशन मुंबई यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्ष म्हणून विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर असणार आहेत. यावेळी जेष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असून प्रवीण दवणे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या दोनदिवसीय संमेलनाचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार असून समारोप समारंभाला पालकमंत्री दादाजी भुसे हे उपस्थित रहाणार आहेत. या संमेलनामध्ये अशोक नायगावकर, ॲड.उज्ज्वल निकम यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. विविध चर्चासत्रे, परिसंवाद, कविसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम असलेले हे संमेलन नासिकला होत आहे, संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विलास पोतदार, कार्यवाह सुभाष सबनीस व आयोजकांचे वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे