कालिदास संस्कृत विद्यापीठातून नाशिकचा अद्वैत पैठणे सर्वप्रथम !
कालिदास संस्कृत विद्यापीठातून नाशिकचा अद्वैत पैठणे सर्वप्रथम !
नाशिक ( प्रतिनिधी )::- येथील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचा विद्यार्थी अद्वैत पैठणे शुक्ल यजुर्वेद वेदविद्या विषयात उत्तम गुणांनी विद्यापीठात सर्वप्रथम उत्तीर्ण झाला आहे. हे प्रतिष्ठान कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, नागपूर विद्यापीठाचे अधिकृत वेदविद्येसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव मान्यताप्राप्त केंद्र आहे.
या निवासी गुरुकुलाद्वारे वेदविद्या प्रवेशिका, वेदविद्या कनिष्ठ पदविका, ज्येष्ठ पदविका इयत्ता बारावी समकक्ष अभ्यासक्रम असून 'वेदविद्या बीए' चा अभ्यासक्रम या वेदपाठशाळेत राबविण्यात येतो. यावर्षीच्या उन्हाळी परीक्षा गेल्या महिन्यात घेण्यात आल्या. त्यात या केंद्रावर सदतीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान वेदपाठशाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या विद्यार्थ्यांना वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी, वेदमूर्ती हरीश जोशी, वेदमूर्ती गोविंद पैठणे आदींचे मार्गदर्शन लाभले. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचे एकमेव असलेले महाकवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक वेदविद्याच्या परीक्षा या केंद्रातर्फे देता येते, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

वेदविद्येच्या झालेल्या परीक्षांमध्ये अद्वैत पैठणे यास सर्वाधिक गुण प्राप्त झाले असून प्रथमश्रेणीत विशेष प्राविण्य प्राप्त झाले आहे. तन्मय अग्निहोत्री ( वेदविद्या प्रवेशिका प्रथम श्रेणी ), गणेश जोशी ( ज्येष्ठ पदविका प्रथम श्रेणी), रोहित निरंतर ( कनिष्ठ पदविका प्रथम श्रेणी ) तसेच वेदांत पैठणे, तुषार सडेकर, अथर्व कुलकर्णी, आदर्श मिश्रा, दिशांत पार्डीकर, महेश जोशी व प्रणव जाखडी हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान येथे सात वर्षांचा अभ्यासक्रम राबविण्यात येतो.
राज्यभरातील विद्यार्थी येथे दरवर्षी शिकण्यासाठी दाखल होतात. त्यांची विनामूल्य अध्ययना बरोबरच निवास व भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानतर्फे केली जाते.
राज्यभरातील विद्यार्थी येथे दरवर्षी शिकण्यासाठी दाखल होतात. त्यांची विनामूल्य अध्ययना बरोबरच निवास व भोजनाची व्यवस्था प्रतिष्ठानतर्फे केली जाते.
सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील कारर्किर्द यशस्वितेसाठी हार्दिक शुभेच्छा !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा