सहायक पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
सहायक पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक::- येथील उपनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक आलोसे सागर गंगाराम डगळे, (वय ३८ वर्ष) यांस ७०००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
यातील तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपास कामी पुणे येथे जाण्यासाठी लागणाऱ्या खाजगी वाहनाचा खर्च व जेवणाच्या खर्चासाठी, आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे १०,०००/- रुपये लाचेची मागणी करून ७०००/- रुपये लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. म्हणून आलोसे यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी अनिल बागुल, (पोलीस निरीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक सापळा पथक पो. ना. किरण अहिरराव,
पो. ना.अजय गरुड, पो.ना. चंद्रशेखर मोरे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा