२५००० रुपयांची लाच मागिल्याप्रकरणी आलोसे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात !

२५००० रुपयांची लाच मागिल्याप्रकरणी आलोसे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात !
          नासिक::- आलोसे विवेक अशोक पवार, वय- ३५ वर्ष, धंदा- नोकरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक, नेमणूक - कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर यांस २५०००/- रुपये लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
    यातील तक्रारदार यांचा मावस भाऊ व त्याच्याबरोबर असलेले चार सह आरोपी यांचेवर कोतवाली पोलीस ठाणे, अहमदनगर येथे दाखल गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करता अटकपूर्वक जामीन मंजूर होणे कामी मदत करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पंचवीस हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

         सापळा अधिकारी संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, सापळा पथकतील पो. हवा. एकनाथ बाविस्कर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे