राज्य लघुलेखक मोफयुसिल संघटनेची नाशिक विभागीय कार्यकारीणी जाहिरअध्यक्ष -सुरेश आघाव, उपाध्यक्ष -राजश्री साळवे, सचिवपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

राज्य लघुलेखक मोफयुसिल संघटनेची नाशिक विभागीय कार्यकारीणी जाहिर
अध्यक्ष -सुरेश आघाव, उपाध्यक्ष -राजश्री साळवे, सचिवपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

           नाशिक (न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.)::-
महाराष्ट्र राज्य स्टेट गव्हर्नमेंट मोफयुसिल स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूरच्या नाशिक विभागाची कार्यकारीणीची निवड झालेली असून अध्यक्षपदी सुरेश आघाव- नाशिक, उपाध्यक्ष  राजश्री साळवे- नाशिक, सचिवपदी डॉ. सोमनाथ वडनेरे जळगाव यांची निवड झालेली आहे.


          शॉर्टहँड कला विकास तसेच प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी राज्य स्टेनोग्राफर्स  संघटना गेल्या ५४ वर्षापासून कार्य करीत आहे. नाशिक विभागाच्या कार्यकारिणीचे गठण करण्यासाठी  नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील लघुलेखकांची अनौपचारिक बैठक नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या सभागृहात येथे आयोजित करण्यात आली.त्यात नवीन कार्यकरीणीची निवड झाली.


नवनियुक्त  कार्यकारिणी पुढीलप्रमाणे::-
अध्यक्ष - सुरेश  आघाव, (नाशिक), उपाध्यक्ष- राजश्री साळवे (नाशिक) सचिव- डॉ. सोमनाथ वडनेरे (जळगाव) कोषाध्यक्ष -नवनाथ लोहकरे (नाशिक) कार्याध्यक्ष श्रीमती प्राजक्ता आघाव (अहमदनगर) कार्यकारिणी सदस्य, विकास साळवे (अहमदनगर) तुषार भामरे (नाशिक) राजेंद्र काळे (नाशिक) निर्मला चतुर (नाशिक) डॉ. महेंद्र महाजन (जळगाव) सुधीर खैरनार (धुळे) विजय सोनवणे (धुळे) संजय निकुंभे (धुळे) अशफाक शेख (नंदूरबार)  दिनेश गुरव (नंदूरबार) मार्गदर्शक - दिलीप गिते (नाशिक)  
        कार्यकारिणीस राज्य अध्यक्ष हरीष वारुडकर, सरचिटणीस अ ॅड. डी. डी. देशपांडे यांनी मान्यता देऊन अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !

भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी आयोजन...!

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,