२१ एप्रिल रोजी प्रतिनिधी निवड !

२१ एप्रिल रोजी प्रतिनिधी निवड !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

विद्यार्थी प्रतिनिधी निवडीकरीता दि. २१ एप्रिल रोजी निवडणूक

        नाशिक (दि.१९) -
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेतून अधिसभेकरीता विद्यार्थी प्रतिनिधी निवडीबाबत शुक्रवार, दिनांक २१ एप्रिल २०२३ रोजी निवडणूक जाहिर करण्यात आली आहे.


याबाबत निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियम १९९८ मधील कलम २३(२) (टी) नुसार विद्यापीठ अधिसभेकरीता तीन विद्यार्थी प्रतिनिधींची निवड निवडणूक प्रक्रियेव्दारे करण्यात येते. याअनुषंगाने संलग्नित महाविद्यालयांकडून विद्यापीठास प्राप्त झालेल्या विद्यार्थी सचिवांच्या यादीतून विद्यार्थी परिषद गठित करण्यात आली आहे. सदर नवनियुक्त विद्यार्थी परिषदेतील सदस्यांमधून विद्यापीठ अधिसभेवर तसेच कार्यकारी समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
          विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेतून अधिसभेसाठी प्रतिनिधी निवडीबाबत निवडणूक कार्यक्रमपत्रिका व विद्यार्थी सचिवांची यादी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आली आहे. या अनुषंगाने दि. २१ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता विद्यापीठ मुख्यालयात सदर मतदार यादीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी निवडीकरीता महाविद्यालयाच्या ओळखपत्रासह हजर राहणे अपेक्षित आहे. मतदान, मतमोजणी व मतदानाचा निकाल त्वरीत जाहिर करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती विद्यापीठाचे संकेतस्थळ  www.muhs.ac.in  वर प्रसिध्द करण्यात करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !