चमत्कारच, एकाच वेळी दोन गाड्यातून चेअरमन फिरत होते ! -- देविदास पिंगळे
चमत्कारच, एकाच वेळी दोन गाड्यातून चेअरमन फिरत होते ! -- देविदास पिंगळे
जिल्हा बँकेची परिस्थिती झाली तशी बाजार समितीची होऊ देऊ नका -- माजी खासदार पिंगळे
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.
शिलापूर(प्रतिनिधी)::-मागील तीन वर्षांत नाशिक बाजार समितीत मोठा भ्रष्टाचार केला असून स्वमालकीच्या गाडीत देखील टायर आणि डिझेल, पेट्रोल बाजार समितीच्या पैशातुन टाकले आहे तर एकाच वेळी दोन गाड्यातून चेअरमन फिरत होते हा चमत्कारच म्हणावे लागेल, असा खोचक टोला देत मी चेअरमन असताना एका रुपायांचे जरी स्वमालकीच्या गाडीत पेट्रोल, डिझेल टाकलेले दाखवा त्या क्षणाला माघार घेईल असे प्रतिपादन आपलं पँनलचे नेते तथा माजी खासदार देविदास पिंगळे यांनी करत मागील काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी परिस्थिती झाली तशी नासिक बाजार समितीची होऊ द्यायची नसेल तर आपलं पँनलच्या उमेदवारांना बाजार समितीवरती पाठवण्याचे आवाहन केले.
नाशिक बाजार समिती पंचवार्षिक निवडणूकीसाठी येत्या२८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असुन त्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून आपलं पँनलचे नेते पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या आपलं पँनलच्या प्रचाराचा नुकताच ओढा येथील श्रीगणेश मंदिरात जावून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी ओढा येथील प्रचारसभेत सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच साहेबराव पेखळे होते. व्यासपीठावर विजय करंजकर, आमदार सरोज आहिरे, वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे, डी.जी.सुर्यवंशी, कामगार नेते भास्कर गोडसे, निवृत्ती कांडेकर, विष्णूपंत म्हैसधुणे, संजय तुंगार, संपत सकाळे, आदींसह आपलं पँनलचे उमेदवार उपस्थित होते.
पिंगळे पुढे म्हणाले की, आज जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी अवस्था झाली तशी अवस्था बाजार समितीची होऊ देऊ नका, येणाऱ्या काळात शेतकरी वर्गाला देशातील कृषी तज्ञांच्या माध्यमातून कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरोज आहिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सध्या नाशिक बाजार समिती मधे गुंडाराज चालू असुन ते थांबविण्यासाठी आपलं पँनलचे नेतृत्व करणारे देविदास पिंगळे यांच्या हातात शेतक-यांच्या विकासासाठी व बाजार समितीच्या प्रगतीसाठी एक हाती सत्ता द्या म्हणजे काम करणे सोपे जाते असे सांगत येणाऱ्या काळात बाजार समितीच्या विकासासाठी मी सरकारच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करेल.
विजय करंजकर म्हणाले की, शेतकरी वर्गाचे विमा पाँलिशी पिंगळेच्या कारकिर्दीत काढण्यात आली मात्र का काढली म्हणून त्याची चौकशी लावण्याचे काम विरोधकांनी केले, तर शेतकऱ्यांची थट्टा करु नका. हेटाळणी करु नका माझा शेतकरी कधीच माफ करणार नाही, शिवाय ज्या भाषेत बोलाल त्याचं भाषेत उत्तर देईन त्यामुळे आम्ही सरळ आहोत सरळ राहु द्या असे सांगत गुंडागर्दी नेस्तनाबुत करा असे आवाहन केले.
यावेळी आमदार वसंत गिते, कामगार नेते भास्कर गोडसे, गजानन भोर, संपत सकाळे, भास्कर गावित आदीनी मार्गदर्शन केले. आपलं पँनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी निवृत्ती अरिंगळे, प्रकाश म्हस्के, दादा पेखळे, नवनाथ गायधनी, शरद गायखे, बबन कांगणे, अजित गायधनी, गणेश गायधनी,अनंता चारस्कर, अशोक बोराडे, अनिल काकड, भाऊसाहेब ढिकले विश्वास कळमकर, राहुल धात्रक, नामदेव कांडेकर, बहिरु जाधव, अशोक पांळदे, माणिक कासार, सुरेश घुगे, युवराज जगळे, सचिन मानकर, विजया कांडेकर, सविता तुंगार,निर्मला कड, तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, सुरेखा वलवे, आत्माराम दाते, रंगनाथ पेखळे, ज्ञानेश्वर गायधनी आदीसह शेतकरी, मतदार व नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा