सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन !
सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.
नाशिक (नांदगाव)::- येथे मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ या दिवशी सैनिक कल्याण सेवाभावी संस्था नाशिक महाराष्ट्र राज्य तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त नांदगाव तालुका अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरनार वस्ती येथील सर्व मुलांना शालेय बैग, वह्या, पेन, पेन्सील, ईतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन व विरमाता-पिता, वीरनारी, आजी-माजी सैनिक, सैनिक परीवार यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे पदाधिकारी व प्रमुख सरकारी अधिकारी यांचे स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष संजय गोविंद खैरनार, व मुख्याध्यापक रमेश अहिरे यांच्या नियोजनाद्वारे शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत पुष्पवर्षाव, ढोल व टाळ्या वाजवून करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी नवनाथ पगार संस्थापक अध्यक्ष सैनिक कल्याण सेवाभावी संस्था नाशिक महाराष्ट्र राज्य व सरकारी अधिकारी, संदिप दळवी सहगटविकास अधिकारी नांदगाव यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
उपस्थित वीरमाता- पिता, आजी- माजी सैनिक व सैनिक परीवार यांचा सत्कार यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, शुद्ध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या, त्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत बक्षीसे देण्यात आली.
विरपत्नी, विरमाता, गं.भा.अन्नपुर्णाबाई खैरे व मिराबाई पाटिल, वंदनाताई सुरसे यांचा साडी देवून सत्कार करण्यात आला. आजी, माजी सैनिक परीवार सत्कारात निंबादास खैरनार, ताराचंद खैरनार, शिवाजी आहेर, जगंन्नाथ खैरनार, रामदास शिंदे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
सहगटविकास अधिकारी संदिप दळवी, नानासाहेब काकळीज, सचिव गोपीनाथ देशमुख, नवनाथ पगार यांचे अध्यक्षीय भाषण झाले. संजय खैरनार यांचेकडून संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक कामकाजाबद्दल ची माहिती यावेळी देण्यात आली. त्यांनतर शालेय विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत शालेय वस्तू, स्कुल बॅग, शालेय उपयोगी साहित्य व अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेमार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला, ह्या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष, प्रवक्ते संजय गोविंद खैरनार सैनिक कल्याण सेवाभावी संस्था नाशिक महाराष्ट्र राज्य यांनी केले होते.
कार्यक्रमास नवनाथ पगार, संस्थापक अध्यक्ष. सै.क.से.संस्था, सचिव गोपिनाथ देशमुख, सहसचिव हेमंत सोनवणे, खजिनदार मारुती जाधव, सहसचिव शांताराम रोडे, सदस्य मधुकर म्हस्के, उपसरपंच नवनाथ पवार (माजी सैनिक) नागापूर, गणेश चौधरी, तालुका अध्यक्ष नांदगाव भा.माजी सैनिक संघटनेचे दिनकर आहेर, सचिव नानासाहेब काळीज, गरजेराव मोहिते, उत्तमराव सौंदाणे, श्रावण आढाव तसेच विस्तार अधिकारी विजय ढवळे, गंगाधरी सरपंच सुनील खैरनार, तालुक्यातील इतर माजी सैनिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
जिल्हा परिषद गंगाधरी शाळेचे मुख्याध्यापक रमेश आहीरे व शिक्षीका सौ. आहेर यांनी शाळेत संस्थेमार्फत उपक्रम राबविल्याबद्दल संस्था पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा