२५००० रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
२५००० रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक::- आलोसे नितीन सगाजी मेहेरखांब, वय -४२ वर्ष, ग्रामसेवक, पाथरे, ता. सिन्नर याने ५००००/-₹ लाचेची मागणी केली होती त्यातील २५०००/- ₹ पहिला हप्ता स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार यांचे पाथरे, खु ll. ता. सिन्नर, जि. नाशिक येथे गावठाण हद्दीत जुने घर असून त्यांनी सदर घराचा काही भाग व ओटा तोडून दोन मजली इमारत बांधले असून, सदर गावठाण मधील इमारतीची नोंद करून व इमारतीची ग्रामपंचायत प्रमाणे घराची घरपट्टी ठरवून देण्याचे मोबदतल्यात आलोसे नितीन मेहेरखांब, ग्रामसेवक, सजा पाथरे यांनी दि.१२/०४/२०२३ रोजी ५०,०००/-₹ लाचेची मागणी करून त्याचा पहिला हफ्ता २५,०००/- ₹ दि.१२/०४/२०२३ रोजी स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सापळा अधिकारी श्रीमती साधना इंगळे, पोलीस निरीक्षक, सापळा पथकातील पो. हवा.सचिन गोसावी, पो. हवा. प्रफुल्ल माळी, चालक.पो.ना.परशुराम जाधव यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
सगळेच ग्रामसेवक घेतात. त्याचा हिस्सा बीडीओला पण असतो.
उत्तर द्याहटवाWrong
उत्तर द्याहटवासर्वच यंत्रणा भ्रष्टाचारी आहे
उत्तर द्याहटवा