सोशल मीडिया बळकटीकणासाठी महाराष्ट्र भर झंझावात, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या प्रवाहात सामील करावे-श्वेता शालिनी
सोशल मीडिया बळकटीकणासाठी महाराष्ट्र भर झंझावात, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या प्रवाहात सामील करावे-श्वेता शालिनी
नाशिक: सोशल मीडियाची व्याप्ती कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीचे विविध उपक्रम व केंद्र सरकार व राज्य सरकारचे निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावेत असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश प्रवक्त्या व सोशल मीडियाच्या प्रदेश प्रभारी श्वेता शालिनी यांनी केले. त्या सोशल मीडियाच्या नाशिक बैठकीत बोलत होत्या. त्यांचा सोशल मीडियाच्या मजबुती करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा चालू असून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाशिक महानगर व नाशिक ग्रामीण च्या सोशल मीडिया कार्यकर्त्यांना संबोधित केले .
या वेळी संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव तसेच प्रदेश प्रवक्ते व माजी सोशल मीडिया प्रदेश संयोजक, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, नाशिक शहर सोशल मीडिया संयोजक तुषार जोशी नाशिक ग्रामीण सोशल मीडिया संयोजक योगेश चौधरी, राम डोबे, प्रदीप पाटील, ऋषिकेश ठाणगावकर, निखिल जाधव, दिलीप सानप, विशाल ललवाणी, प्रारब्ध नाठे, स्वप्नील दिगडे, शुभम ढिकले, तुषार नाटकर, स्वाती आडके, प्रसाद धोपावकर, साक्षी दिंडोरकर, आदी उपस्थित होते.
यावेळी श्वेता शालिनी यांनी कार्यकर्ता हा पक्षाचा चेहरा असून कार्यकर्त्यांनी पक्षाची भूमिका मांडताना सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा जग गतिमान झालेले आहे त्याच गतिमानतेने आपण जनतेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचले पाहिजे. यावेळी त्यांनी नाशिक महानगर व नाशिक जिल्हा ग्रामीण सोशल मीडियाच्या विविध रचनांचा तसेच कामाचा आढावा घेतला व ज्या आघाड्या व प्रकोष्ट यांचे सोशल मीडियाच्या रचना बाकी असतील त्यांनी त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असे आवाहन केले. त्यापुढे म्हणाल्या की भारत देश हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विश्वगुरू होणार तो दिवस लांब नाही असे सांगून २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी टूल असून सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ ला ही प्रचंड मतांनी पंतप्रधान होतील यात मात्र शंका नाही परंतु विरोधक छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून भाजपाला बदनाम करत असतात, सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कार्यकर्त्यांनी विरोधकांना योग्य उत्तर देऊन त्यांची जागा दाखवावी. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोशल मीडिया सक्षमीकरण या विषयावर विशेष लक्ष असून शिंदे फडणवीस सरकार हे गतिमान सरकार आहे या सरकारमधील जनहिताचे निर्णय त्याच गतीने जनतेपर्यंत पोहचिण्यासाठी सोशल मीडिया चा वापर व्हावा असे त्या म्हणाल्या. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व त्यांच्या कार्यशैलीचे जगभरातून कौतुक होत असून विरोधक या ना त्या त्या कारणावरून केंद्र सरकारला बदनाम करत असतात परंतु भारतातील जनता सुज्ञ असून विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड बहुतांनी सत्तेवर बसवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोशल मीडियाचे नाशिक शहर संयोजक तुषार जोशी व नाशिक ग्रामीणचे संयोजक योगेश चौधरी यांनी आपापल्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा सादर केला, स्वाती आडके व साक्षी दिंडोरकर यांनी श्वेता शालिनी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा