माय मी येसू वं वणी गड ले ! यांतून अजय कुमावत प्रेक्षकांना दिसले नव्या रूपात !

माय मी येसू वं वणी गड ले ! यांतून अजय कुमावत प्रेक्षकांना दिसले नव्या रूपात !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

जळगाव (प्रतिनिधी)::-खान्देशी कलाकार अजय कुमावत यांचे नवीन गाणं माय मी येसू वं वणी गड ले हे नुकतेच रिलीज झाले आहे व काही तासात या गाण्याला हजारो प्रेक्षकांनी पसंत केले. हे गाणं Pramod Mahajan Jalgaon YouTube channel वर रिलीज झाले आहे.

या गाण्याची सर्व तांत्रिक बाजू प्रमोद महाजन यांनी सांभाळत एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर केले. या गाण्याचं चित्रीकरण जळगावातील नशिराबाद येथील निसर्गरम्य वातावरणात झाले आहे. या गाण्यात दोन जोडींचा समावेश आहे. अजय कुमावत यांच्या सोबत प्रार्थना गायकवाड व प्रमोद महाजन सोबत नम्रता बाविस्कर दिसून आले आहेत. त्याचा हा हटके नवीन अंदाज हा बऱ्याच लोकांना आवडत आहे.

           नावीन्यपूर्ण गाणं व्हावे हि इच्छा मनात बाळगून गाण्याचं चित्रीकरण आयफोन वर (iPhone) करण्यात आले आहे. गाणं भैय्यासाहेब मोरे व मेघा मुसळे यांनी गायले आहे. गाण्याला संगीताची साथ प्रमोद महाजन यांनी दिली आहे व दिग्दर्शन प्रदीप भोई यांनी केले आहे. उत्कृष्टपणे एडिटिंग योगेश ठाकूर यांनी आपले कौशल्य वापरून केले आहे.

        प्रार्थना गायकवाड यांनी पहिल्यांदाच गाण्यात काम केले मात्र पदार्पणातच आपली छाप पाडण्यात यशस्वी झाल्या आहेत. या गाण्याचं प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत असून इतरांनीही गाण्याच्या सुमधूर संगीताचा आस्वाद घ्यावा असे सांगण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !