सामाजिक कार्याचा ब्रँड निर्माण होणे काळाची गरज, गुणवत्तेच्या आधारे कार्य सिद्ध करा-समाज कल्याण आयुक्त

सामाजिक कार्याचा ब्रँड निर्माण होणे काळाची गरज, गुणवत्तेच्या आधारे कार्य सिद्ध करा-समाज कल्याण आयुक्त

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.

           नाशिक (दि.२३)::- समाजात कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपल्यात असलेल्या गुणवत्तेच्या आधारे स्वतःला सिद्ध करून आपला सामाजिक कार्याचा ब्रँड निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

          अत्त दीप भव: मेडिकोच सोशल वेलफेअर असोसिएशन नाशिक यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित "क्रांतीचा साक्षीदार" या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते कालिदास कलामंदिर येथे झाले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अत्त दीप भव: मेडिकोच सोशल वेलफेअर असोसिएशनच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.


           सदर कार्यक्रमास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. भगवान वीर, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तसेच क्रांतीचा साक्षीदार नाट्याचे दिग्दर्शक रुपेशकुमार निकाळजे, डॉ.जे.एल.वाघ, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, असोसिएशनचे नूतन अध्यक्ष डॉ. विशाल जाधव, डॉ.रेश्मा घोडेगाव, डॉ.श्रीकांत खरे, डॉ.परीक्षित निकम, डॉ विशाखा तागडे, निवृत्त न्यायमूर्ती अनिल वैद्य, पोलीस अधिकारी मनीषा धोंडे, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

          कोणत्याही समाज घटकाने समाज हिताचे काम करतांना समाजातील सर्वच घटकांना त्यात सामावून घेतले पाहिजे, आपल्या कार्याचा ठसा चिरंतनकाळ लक्षात राहील असे कार्य आपल्या हातून होणे आवश्यक आहे असेही डॉ. नारनवरे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर आपल्या कार्याचे चिंतन देखील सातत्याने करण्यात येऊन त्यामध्ये काळानुरूप बदल होणे आवश्यक असल्याचेही शेवटी डॉ. नारनवरे यांनी स्पष्ट केले.

          यावेळी प्रादेशिक उपसंचालक बहुजन कल्याण विभाग डॉ. भगवान वीर यांनी देखील बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी समाजातील शिक्षित वर्गाने सातत्याने संघटनांच्या माध्यमातून व कार्यातून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

        सदर कार्यक्रम प्रसंगी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष डॉ. विशाल जाधव व मावळते अध्यक्षा डॉ. रेश्मा घोडेराव यांनी असोसिएशनच्या कामकाजाचा आढावा यावेळी सादर केला. तसेच असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची यावेळी घोषणा करण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशन चे पदाधिकारी डॉ.सुनिता खरे, डॉ. कुणाल निकाळे, डॉ.त्रिरश्मी अहिरे, डॉ. सतीश वाघमारे, डॉ. आशिष मेश्राम, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. विक्रांत किवंडे यांच्यासह असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी नाशिक शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल