परदेशातील विद्यार्थ्यांनो, समाज व देशाचे नाव उज्वल करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा !

परदेशातील विद्यार्थ्यांशी डॉ. एंगडे यांचा संवाद, समाज व देशाचे नाव उज्वल करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

       पुणे (दि.४)::- समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती चा लाभ घेत असलेल्या जगातील विविध शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी डॉ. सुरज एंगडे यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. शासनाने जी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली आहे तिचा लाभ घेऊन व ज्या सामाजिक परिस्थितीतून आपण पुढे आला आहात त्या परिस्थितीची जाणीव ठेवून समाजाचे व देशाचे नाव कसे उज्वल होईल यासाठी सतत प्रयत्नशील असणे आवश्यक असल्याचे यावेळी डॉ. एंगडे यांनी सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालुन दिलेले आदर्श डोळ्यासमोर ठेवुन  समाजाला, शहराला, राज्याला व देशाला अभिमान वाटेल असे कार्य करावे व आपल्या कार्यातून आपण आयडॉल निर्माण करावे असाही संदेश यावेळी डॉ. एंगडे यांनी परदेशी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिला. 

                    यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देखील परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार येणाऱ्या काळात निश्चितच शिष्यवृत्ती योजनांमध्ये महत्वपूर्ण बदल करणार असल्याचे            यावेळी सांगितले.

सदर संवाद कार्यक्रमात  चाळीस देशांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्या सर्व विद्यार्थानी ह्या संवाद कार्यक्रमाबदल आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांचे आभार व्यक्त केले. समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त भारत केंद्रे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल