विद्यार्थिनींची सलग १८ तास अभ्यास स्पर्धा संपन्न !

विद्यार्थिनींची सलग १८ तास अभ्यास स्पर्धा संपन्न !
सामाजिक न्याय पर्व, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींची १८ तास अभ्यासाची स्पर्धा संपन्न !

      नाशिक (दि.२१)::- समाज कल्याण विभागाच्या वतीने सामाजिक न्याय पर्व हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक १ एप्रिल ते दिनांक १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात येत आहे.

           येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने), मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह युनिट-४ व गुणवंत मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थिनींनी १८ तास अभ्यास स्पर्धा आयोजित केली होती. डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिन्ही वसतिगृहातील ५५ विद्यार्थ्यीनी या १८ तास अभ्यास स्पर्धत सहभागी होऊन अभिनव पद्धतीने जयंती कार्यक्रम साजरा केला.

सकाळी ६ वाजता सुरू झालेली स्पर्धा रात्री दीड वाजता संपन्न झाली. वसतिगृहाच्या वाचनालयात या स्पर्धेची सोय करण्यात आली होती. सदर विद्यार्थिनींनी आपापल्या विषयाच्या पाठ्यक्रम अभ्यासक्रमाचे अध्ययन केले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना प्रेरणा मिळावी म्हणून श्रीमती हर्षदा बडगुजर विशेष अधिकारी, समाज कल्याण विभाग या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यीनीनी आयोजित केलेल्या या १८ तास अभ्यास स्पर्धेबद्दल 
नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, तसेच वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती सरिता रेड्डी, श्रीमती येलमामे मॅडम व श्रीमती शुभांगी भालेराव यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल