ओळख आपल्या विश्वाची ! आकर्षक चित्रफीतींसह आगळ्यावेगळ्या पद्धतीने होत असलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन !!

ओळख आपल्या विश्वाची !    आकर्षक चित्रफीतींसह आगळ्यावेगळ्या पद्धतीने होत असलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन !!
गिरीश पिंपळे यांच्या पुस्तकाचा
रविवारी प्रकाशन सोहळा !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.

      नाशिक ( प्रतिनिधी )- येथील सुप्रसिद्ध खगोल अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी लिहिलेल्या “ओळख आपल्या विश्वाची“ या पुस्तकाचे प्रकाशन “ संस्कार भारती “ तर्फे येत्या रविवारी ३० एप्रिल रोजी होणार आहे. हे पुस्तक पुणे येथील राजहंस प्रकाशन या नामवंत संस्थेतर्फे प्रकाशित होत आहे.

    या पुस्तकात कोणतीही अवघड तांत्रिक माहिती न देता अगदी साध्या-सोप्या भाषेत आपल्या अतिविराट विश्वाची ओझरती ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खगोलशास्त्र या विषयाची ज्यांना आधीपासूनच आवड आहे त्यांची आवड अधिक वाढावी आणि ज्यांना या विषयात रस नाही त्यांना तो निर्माण व्हावा यासाठी हे पुस्तक पिंपळे यांनी लिहिले  आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पं. डॉ. अविराज तायडे असून पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. विद्यासागर हे नामवंत विज्ञान साहित्यिक असून रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. राजहंस प्रकाशन या संस्थेचे संपादक डॉ. सदानंद बोरसे हेही यावेळी उपस्थित राहतील.  

    हा कार्यक्रम नानाराव ढोबळे सभागृह, शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक येथे संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे. तो सर्वांसाठी खुला असून श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पुस्तक प्रकाशन अभिनव पद्धतीनं होणार आहे. तसंच या कार्यक्रमात विश्वाशी संबंधित काही आकर्षक चित्रफितीही दाखवण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल