नासिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार !

नासिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801,

      नाशिक::- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षप्रवेश समारंभ संपन्न झाला.


    यावेळी सटाणा येथील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह, नगरसेवक, सरपंच व मनमाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य  पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. 

       
 याप्रसंगी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री विक्रांत दादा पाटील, मालेगाव जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, संघटन सरचिटणीस देवा पाटील, खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, आमदार सीमा ताई हिरे यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !