आरोप प्रत्यारोपांनी गाजणार बाजार समिती निवडणुक ! विरोधकांची मतदारांसमोर प्रश्न फेकण्याची रणनिती !

 आरोप प्रत्यारोपांनी गाजणार बाजार समिती निवडणुक !
 विरोधकांची मतदारांसमोर प्रश्न फेकण्याची रणनिती !
   न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
   नासिक (प्रतिनिधी)::- राज्यातील २८६ बाजार समिती तील निवडणुकीचा बिगुल वाजला असून नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समितीमध्ये निवडणूक होत आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण २४२० इच्छूकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

            लासलगाव, पिंपळगाव व नाशिक या बाजार समितीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असून यापुढे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे जवळजवळ निश्चित झालेले आहे, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये विकासाच्या नावाखाली अनेक कामे करण्यात आली आहेत,  बाजार समितींमध्ये झालेल्या कामांत कथित अनियमित्ता दाखवत अनेक प्रकारचे चुकीची कामे झालेली आहेत असा आरोप सातत्याने होत आहे. या अस्राचा वापर विरोधक मोठ्या प्रमाणात करण्याची शक्यता असल्याने निवडणूक चुरशीची होणार असे दिसते. बाजार समितीमधील बांधण्यात आलेले लिलाव शेड, अंतर्गत रस्ते, काॅंक्रिटिकरण, संरक्षक भिंत, यामध्ये ठराविक ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांची मक्तेदारी असल्याचा आरोप होतो. सत्तेवर असलेल्यांच्या संगनमताशिवाय हे घडत नाही असा जो समज आहे त्याचे उत्तर तत्कालीन सतत्ताधाऱ्यांना देण्याचा आटोकाट प्रयत्न करावा लागणार. यावर मतदार कसा प्रतिसाद देतील आणि विरोधक कोणत्या आक्रमकतेने याचा सामना करतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 
       ठेकेदार, तांत्रिक सल्लागार व सत्ताधारी यांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप, कामांना कोणाच्या आशीर्वादाने पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला या मुद्द्यांवर विरोधकांनी मतदारांसमोर प्रश्न फेकण्याची रणनिती आखली असून यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ पूर्वीच्या संचालक मंडळावर आणून ठेवण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल