नुकतेच लग्न झालेल्या मुलीस पित्याचे पत्र ! पती सैन्यदलात असल्याने राज्याबाहेर बदली होऊ शकते जिथे कुठे असशील तिथे "साप्ताहिक न्यूज मसाला" वाचनात ठेव.

नुकतेच लग्न झालेल्या मुलीस पित्याचे पत्र !

पती सैन्यदलात असल्याने राज्याबाहेर बदली होऊ शकते जिथे कुठे असशील तिथे "साप्ताहिक न्यूज मसाला" वाचनात ठेव.

प्रिय सौ.उमा ,
तुझ्या आई आण्णा कडून अनेक उत्तम आशीर्वाद.
      आता तुझे उमा काळे हे नाव बदलून सौ. उमा ओंकार हाडके असे झाले आहे. २४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी नाशिकला लक्षिका मंगल कार्यालयात भारतीय सैन्यदलात अधिकारी असलेले श्री. ओंकार यशवंत हाडके राहणार पुणे यांच्याही तुझा विवाह झाला. 
कोरोना काळात वर्क फ्रॉम होम असल्याने पुण्यात नोकरी करीत असलेल्या तुला नाशिकला येऊन कुटुंबात राहता आले. बारावी नंतर जवळपास सात वर्षे पुण्यात शिक्षण व नोकरी असल्याने पंधरा दिवसातून एकदा तू नाशिकला येत होती. आई वडील, आजी, काका काकू चुलत भावंडे योगेश व गौरी व काकूचे वडील आम्हा सर्वांना आनंद होत असे. एकुलती एक लेक असल्याने तुला पूर्ण स्वातंत्र्य होते, मोकळीक होती, त्याचा तू कधी गैरफायदा घेतला नाही. कौटुंबिक चौकटीत राहताना छोटे आनंद, वाचन, नृत्यकला, पर्यटन असे छंद जोपासताना तुझ्यात नवीन गोष्टी शिकण्याचा व करण्याचा प्रचंड उत्साह आहे.

       मदतीची भावना जागृत ठेवून उपक्रम करते. तुझे पती व सासू सासरे व सासरचे सर्वजण चांगली व साधी प्रेमळ माणसे आहेत त्यांना आदराची वागणूक देणे. नोकरी व घरकाम याचा योग्य प्रकारे ताळमेळ बसवून कुटुंबात चांगले वातावरण सातत्याने ठेवण्यासाठी प्रयत्न करीत रहा. मुलगी ही माहेर सासर या दोन खोल्यातली उंबऱ्यावरची दिवलि असून आपल्या प्रेमाने मायेने दोन्ही घरे उजळून टाकण्याची क्षमता मुलींमध्ये असते. आता पती सैन्यदलात असल्याने राज्याबाहेर बदली होऊ शकते जिथे कुठे असशील तिथे साप्ताहिकं न्यूज मसाला वाचनात ठेव. ऑनलाईन ई पेपर वाचू शकते.
कळावे..
तुझे
आई अण्णा...
प्रफुल्लचंद्र काळे
१९२८, सातपूर कॉलनी.सातपूर. नाशिक.
मोबाइल क्रमांक ९२७३०४५७९४
धन्यवाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल