याचिका फेटाळली असेल तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत !

याचिका फेटाळली असेल तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत ! 
शिंदे- फडणवीस सरकार मराठा समाजाला न्याय मिळवून देतील - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास

        नाशिक - मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. शिंदे-फडणवीस सरकार योग्य पद्धतीने काम करून मराठा समाजाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  व्यक्त केला. 

         मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीतून मराठा समाजाबाबत सरकारची आत्मियता दिसून येत, असेही त्यांनी नमुद केले. बावनकुळे म्हणाले, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 
*************************************
           मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने बैठक बोलाविली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. शिंदे-फडणवीस सरकार योग्य पद्धतीने काम करून मराठा समाजाला न्याय मिळवून देतील.
- चंद्रशेखर बावनकुळे
प्रदेशाध्यक्ष, भाजपा, महा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !