वरिष्ठ तंत्रज्ञ व खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !

 वरिष्ठ तंत्रज्ञ व खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !

    नासिक::- फत्तेपूर जि. जळगाव येथील म.रा.वि.वि.कंपनी चा वरिष्ठ तंत्रज्ञ (सिनियर टेक्निशियन) विनोद उत्तम पवार, वय-३२ वर्ष, (वर्ग३) व खाजगी इसम कलिम सलीम तडवी, वय-२७ वर्ष, रा.देऊळगाव, ता.जामनेर यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

          यातील तक्रारदार जळगाव येथे वास्तव्यास आहेत. हे तोरनाळे ता.जामनेर येथील मुळ रहीवासी असून ते सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुळगावी तोरनाळे ता. जामनेर ग्रामपंचायतीच्या त्यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या बखळ जागी त्यांनी तयार केलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये विज मीटरचे नविन कनेक्शन घ्यायचे होते. म्हणून तक्रारदार  म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर कार्यालयात जावून विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी विचारपुस केली असता सदर कार्यालयातील कर्मचारी सिनीयर टेक्नीशियन विनोद पवार व खाजगी इसम कलीम तडवी यांनी तक्रारदार यांना विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी ज्यांच्या नावे कनेक्शन घ्यायचे आहे, त्यांचे आधारकार्ड, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, १००/- रुपयांचा स्टॅम्प पेपर व डिमांडनोट, साहेबांचे व आमचे असे एकुण ३,५००/- रुपये लागतील असे सांगितले व त्याचवेळी डिमांडनोट भरणेसाठी तक्रारदार यांचेकडून २,०००/-रुपये घेतलेले होते. व आज विज मीटरचे नविन कनेक्शन जोडणीसाठी आरोपी क्रं.१ व २ यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष साहेबांचे नावाने उर्वरीत १५००/- रुपयांची लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः आलोसे क्रं.१ यांनी फत्तेपूर गावातील बुलढाणा ते जामनेर रोडवरील बुलढाणा अर्बन बँकेच्या शेजारील बंद दुकानाजवळ  स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. म्हणून दोन्ही आरोपीतांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
     या कारवाईत सापळा व तपास अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव यांच्या सापळा पथक
पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने सह कारवाई मदत पथक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ. सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, एन.एस.न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल