प्राथमिक विश्लेषण, छत्रपती संभाजीनगरची दंगल होती की राजकीय राडा !आपल्याला काय वाटते !!

 प्राथमिक विश्लेषण, छत्रपती संभाजीनगरची दंगल होती की राजकीय राडा !
आपल्याला काय वाटते !!

         छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात परवा रात्री झालेला "राडा" ही खरोखर दंगल होती का हा प्रश्न उपस्थित होतो, नव्हे उपस्थित करावासा वाटतो ! 

       दंगल दोन गटांत, जातीत, धर्मात होते पण छत्रपती संभाजीनगरात अशी कोणत्या दोन गटांत, जातीत, धर्मात घडलीच नाही असे प्रथमदर्शनी दिसते, खरे काय आहे याचे उत्तर शोधण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील पोलिस दलावर आली आहे. भविष्यात उत्तर मिळेल. आज सर्वसामान्य खालीलप्रमाणे प्राथमिक अंदाज वर्तवित आहेत याचा अर्थ महाराष्ट्रातील जनता किती प्रगल्भता दाखवित आहे हे अधोरेखित करायला हवे.

      १)  एम आय एम चे नेते इम्तियाज जलिल घटनास्थळी जाऊन विनंती करतात, रमजान सुरू आहे, मुस्लिम समाज बदनाम होईल असे कृत्य करू नका,
  २) मुस्लिम धर्मगुरू किराडपुऱ्यातील घटनेच्या जागी पोलिसांच्या वाहनावर उभे राहून आवाहन करतात की शांत रहा, अनुचित प्रकार करू नका, आवाहन करीत असताना त्यांच्याही दिशेने दगड यावेत याचा अर्थ काय ? 
    ३) सामान्यांच्या मालमत्तेचे नुकसानीची झळ बसण्याऐवजी १२/ १३ वाहने जाळण्यात आली ती सर्व पोलीसांनी आहेत. 

     ४) दंगल म्हटल्यावर सर्वसामान्यांच्या मनात दंगलीचे चित्र निर्माण करण्याचाच हा प्रकार वाटतो. छत्रपती संभाजीनगरचे हे चित्र व राडा खरोखर दंगल म्हणता येईल ?   
       ५) झालेला राडा जर हिंदू-मुस्लिम असता तर सर्वसामान्यांच्या मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले असते असे काहीही झाले नाही हे अधोरेखित करते की घडलेली घटना"दंगल" नव्हती.
       ६)  तेथे असलेल्या राममंदीरालाही काही धक्का लागला नाही याचा विचार केल्यास याला दंगल म्हणताच येणार नाही, हा फक्त "सुनियोजित राजकीय" राडाच असण्याची दाट शक्यता आहे.
      ७) हिंदू - मुस्लिम समाजाने राडा केलेला नाही, माथे भडकावून केलेला राजकीय राडा वाटतो, मुस्लिम धर्मगुरू तसेच एम आय एम चे नेते इम्तियाज जलिल हे सुद्धा राडा करणाऱ्यांना शांततेचं आवाहन करतात.
      ८)  गृहमंत्री भाजपाचे आहेत म्हणून भाजपासह शिंदे सरकार बदनाम व्हावे हा हेतू कुणाचा तरी असावा याला प्रथमदर्शनी पुष्टी मिळताना दिसते,  
      ९) स्वतःची बदनामी स्वतः कोणताही राजकीय पक्ष वा सामाजिक गट करणार नाही,           याचाच अर्थ दंगलसदृश वातावरण तयार व्हावे मात्र तिला "दोन गटांचे" नांव मिळू नये हीच पार्श्वभूमी या राड्याला लागू पडताना दिसते. पोलीसांकरवी चौकशी समिती नेमण्यात आली आहे, लवकरच तिचा अहवाल येईत, अहवाल येईपर्यंत छत्रपती संभाजीनगरची दंगल नव्हे तर फक्त "राजकीय राडा" होता असेच म्हणावे लागेल !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल