पाच हजारांची लाच घेतांना तलाठी ताब्यात !
पाच हजारांची लाच घेतांना तलाठी ताब्यात !
नाशिक(वार्ताहर)::- अतिरिक्त कारभार असलेल्या तलाठीस ५ हजाराची लाच घेतांना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडत कारवाई केली.
तक्रारदार यांची आत्या हिने तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे असलेली मौजे नागापूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील गट नंबर ३३७ अन्वये एक हेक्टर तीन आर तसेच गट नंबर ३३९ अन्वये एक हेक्टर पाच आर अशी शेती मृत्युपत्र करून लिहून दिली होती. त्या बाबत दुय्यम निबंधक निफाड यांचेकडे दस्त नोंदणी केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याकडे केलेल्या अर्जाअन्वये तक्रारदार व त्यांचे वडील यांचे नाव सदरील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे कामी महेश सहदेव गायकवाड ( वय- ४३ वर्ष, धंदा- नोकरी , तलाठी दावचवाडी अतिरिक्त कार्यभार चितेगाव, तालुका, निफाड, जिल्हा नाशिक ) पाच हजारांची लाच स्विकारताना ताब्यात घेण्यात आले. लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संदिप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलिस नाईक प्रकाश महाजन, शिपाई नितीन नेटारे आदीच्या पथकाने केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा