आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार !

आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार !

- सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत

 

            मुंबईदि. 3 : राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबईपुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.


            पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटेराजेश टोपेअनिल देशमुखरवी राणा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. 


        आरोग्य मंत्री सावंत म्हणाले,  हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा रुग्णांना गोल्डन अवरमध्ये आरोग्य सेवा - सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात  यासाठी स्टेमी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले.      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे