२ मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

२ मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

             नाशिक (विमाका)::- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी जो लढा दिला त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला अभुतपूर्व स्थान आहे . २ मार्च १९३० ते १३ ऑक्टोबर १९३५ दरम्यान पाच वर्ष हा लढा सुरू होता. या घटनेला आज ९३ वर्ष पूर्ण झाली आहेत. या औचित्याने आज मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस व स्मृती स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

            याप्रसंगी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार,  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , काळाराम मंदिर  ट्रस्टचे अध्यक्ष तथा १३ वे जिल्हा सत्र न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, ट्रस्टचे विश्वस्त शांताराम अवसरे, अॕड.अजय निकम, शुभम मंत्री, डॉ.एकनाथ कुलकर्णी, मंदार जानोरकर, मिलिंद तारे, धनंजय पुजारी, नरेश पुजारी  पंचवटी पोलीस स्टेशन वरिष्ठ अधिकारी डॉ.सिताराम कोल्हे उपस्थित होते.
            उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन काळाराम मंदिर व रथाची पाहणी केली. तसेच यावेळी ट्रस्टच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
             अभिवादन प्रसंगी बोलतांना  महानगरपालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार व पोलीस आयुक्त श्री. शिंदे यांनी ट्रस्टच्या  समस्या प्रशासनाच्यावतीने सोडविण्याचे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे