दर्जेदार मराठी चित्रपटांना आज अनुदान वाटप !
दर्जेदार मराठी चित्रपटांना आज अनुदान वाटप !
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी चित्रपटाना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या चित्रपट अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज बुधवार दि.८ मार्च रोजी मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात येणार आहे.
शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी ४१ चित्रपटांना पात्र ठरवले आहे. यातील ४ चित्रपटांना “अ” दर्जा तर ३३ चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला आहे.
तर ४ चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार "अ" दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनुदानप्राप्त चित्रपटाचा चमू उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाने दिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा