कृषी पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

कृषी पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

आलोसे सुधाकर विश्वनाथ सोनवणे,  वय- ५४ वर्ष, कृषी पर्यवेक्षक वर्ग 3, कृषी विभाग, मालेगाव, जिल्हा नाशिक.

   नासिक::- यातील तक्रारदार पुरुष (४४) व त्यांचे भाऊ यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा स्कीम) अंतर्गत ठिबक सिंचन या बाबीसाठी लाभार्थी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या अटीनुसार तक्रारदार व त्याचा भाऊ यांनी त्यांचे कुटुंबाचे  शेतजमिनीवर फळबाग लागवड करून ठिबक सिंचनाचे काम केलेलं आहे. सदर ठिबक सिंचनाचे कामाचे फाईलची तपासणी करून बिले ऑनलाईन अपलोड करणेसाठी आरोपी लोकसेवक सुधाकर विश्वनाथ सोनवणे, कृषी पर्यवेक्षक वर्ग ३, कृषी विभाग, मालेगाव यांनी तक्रारदाराला प्रत्येक फाईल चे १०००/- असे रुपये २०००/- अशी पंचा समक्ष दिनांक १७ मार्च २०२३ रोजी लाचेची मागणी करून, सदर लाचेची रक्कम रुपये २०००/-पंच साक्षीदार यांचे समक्ष दिनांक २१ मार्च २०२३ रोजी स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

            लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नासिक च्या पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा  अधिकारी पोलिस निरीक्षक साधना भोये-बेलगावकर, व सापळा पथक पो. हवा चंद्रशेखर मोरे, सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, पो. ना. विलास निकम, संदीप बतिशे, पो. ना चा. परशुराम जाधव यांच्या कडून यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे