ब्रह्माकुमारी पूनम दीदी स्वामिनी पुरस्काराने सन्मानित !श्र ी स्वामीनारायण कॉलेजमध्ये पुरस्कार सोहळ्याचे आयोजन !
ब्रह्माकुमारी पूनम दीदी स्वामिनी पुरस्काराने सन्मानित !
श्री स्वामीनारायण कॉलेजमध्ये पुरस्कार सोहळ्याचे आयोजन !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
नाशिक (प्रतिनिधी) ::- येथील श्री स्वामीनारायण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यकर्तृत्व करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा स्वामिनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रभू प्रासाद, म्हसरूळ येथील जिल्हा राजयोग सेवा केंद्रातील राज योगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांचा अध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतुलनीय सेवा करत असल्याबद्दल स्वामिनी पुरस्काराने सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देत गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वेदश्री थिगळे, डॉ. सिंधू काकडे, सुनीता पाटील, लेखिका अलका कुलकर्णी, कथक गुरु स्वाती लाहेरी, आणि किरण मोजे या उपस्थित होत्या.
यावेळी समाजसेवा- संगीता जाधव, आरोग्य- वृषाली गडकरी, सिटी लिंक बस चालक मीना लांडगे, बस वाहक करुणा पाटील, बालरोग तज्ञ सुलभा पवार, नवजीवन वृद्धाश्रमच्या संचालिका मेघा जगताप, डॉ. सोनल आहेर, कवियत्री प्रीती पाटील, तनुजा कोठावदे, गायत्री पाटील, अमृता कवीश्वर, डॉ. माधुरी जावळे या विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा स्वामिनी पुरस्कार देत सत्कार करण्यात आला.
यावेळी जागतिक कविता दिवस असल्याने काव्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. काव्य संमेलनास मोठ्या संख्येने कवियत्री उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कॉलेजच्या प्राचार्य अश्विनी अत्रे-दीक्षित यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा