सर्वात्मक कलादालन हे कलाकारांसाठीहक्काचे व्यासपीठ - वसंत खैरनार !

सर्वात्मक कलादालन हे कलाकारांसाठी
हक्काचे व्यासपीठ - वसंत खैरनार !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
         नाशिक ( प्रतिनिधी )::- वाचनसंस्कृती जोपासताना कलासंवर्धनाचे काम सर्वात्मक वाचनालयाने हाती घेतले आहे. नाशिक शहरात अनेक कलादालने बंद पडलेली असताना येथील कलादालनामुळे कलाकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम सर्वात्मक वाचनालयाच्या सहकार्याने या वर्षापासून इंदिरानगरमध्ये घेण्यात येईल असे प्रतिपादन वसंत खैरनार यांनी केले. जिल्हा ग्रंथालय प्रमुख सचिन जोपुळे यांनी  कलादालन या नव्या उपक्रमाचे स्वागत करून शासनातर्फे सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

.       
    इंदिरानगर येथील सर्वात्मक वाचनालयातर्फे परिसरातील कलारसिकांसाठी कलेचा आनंद मिळवण्यासाठी एका सुंदर कलादालनाची निर्मिती केली असुन या कलादालनाचे उदघाटन बुधवार दि. २२ रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जिल्हा ग्रंथालय प्रमुख सचिन जोपुळे, उद्योजक वसंतराव खैरनार, चित्रकार रामदास महाले, चित्रकार भिमराज सावंत, चित्रकार  वासुदेव मराठे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रारंभी सर्वात्मक वाचनालयाचे अध्यक्ष विलास टिळे यांनी स्वागत, प्रस्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी देणगीदारांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एल. पाटील यांनी केले. सचिव भारत बिरारी यांनी आभार मानले. व्यासपीठावर खजिनदार दशरथ जारस, पद्माकर देशपांडे, पुरुषोत्तम रकीबे उपस्थित होते. उदघाटन समारंभाला प्रफुल्ल सावंत, आनंद अभंग, संजय देवधर, अतुल भालेराव, मिलिंद टिळे यांच्यासह अनेक चित्रकार, कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

           
       कलादालनात सुरुवातीला ज्येष्ठ
निसर्गचित्रकार शिवाजी तुपे व रामदास महाले याची निसर्गचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. उदघाटन समारंभाच्या निमित्ताने सर्वात्मक कलादालन व कलामुद्रा ग्रुपतर्फे  सुप्रसिद्ध युवा चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निलेश भारती, शैलेश मेश्राम, मोहन जाधव, संजय दुर्गवाड, कैलास लहानगे, विलास गायकवाड, राकेश सुर्यवंशी, नरेश महाले, ज्ञानेश्वर टोणपे, जितेंद्र घाटगे, सुमित भारद्वाज, सचिन काळे, वैभव गायकवाड, राहुल सातपूते, अविष्कार विसपुते यांची वेगवेगळ्या रंगमाध्यमात रंगवलेली निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे अश्या सुंदर कलाकृतींचा समावेश आहे. रविवार दि.२६ मार्च २०२३ पर्यंत प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते १ व सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत विनामूल्य खुले आहे. रविवार दि.२६ मार्च  रोजी प्रसिद्ध चित्रकारांची प्रात्यक्षिके होणार आहेत. कलारसिकांनी जरुर लाभ घ्यावा असे आवाहन कलादालनाचे प्रमुख विलास टिळे व सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे