श्री सच्चियाय भवानी मातेच्या ज्योतीचे गुढीपाडव्याच्या दिवशी नाशकात आगमन !
श्री सच्चियाय भवानी मातेच्या ज्योतीचे गुढीपाडव्याच्या दिवशी नाशकात आगमन !
नाशिक (न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801)::-राजस्थानातील जोधपुर जवळील ओशिया गावातील ओशियाँ माता उर्फ श्री सच्चियाय भवानी माता जैन, माहेश्वरी समाजाची कुलदेवी आहे. प्रसिद्ध व्यापारी संजय राठी जोधपूरहून मातेची अखंड ज्योत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि.२२) नाशिकमधील रविवार कारंजा येथे घेऊन येणार आहेत. त्यानिमित्ताने भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.
मिरवणुकीमध्ये महिला दिवे, देविचे रुप व ध्वज घेवुन सहभागी होतील. रविवार कारंजापासून मेनरोड - धुमाळ पॉईंट- मुंदडा मार्केट, टिळक पथ, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ - रविवार - पेठे मार्गे मिरवणूक राठी वाड्यापर्यंत पोहचेल. या ठिकाणी महाप्रसाद वितरण व भजनाचा कार्यक्रम होईल. श्री सच्चियाय भवानी माता जैन समाजातील ओसवाल माहेश्वरीतील राठी, सारडा, लोया, लोढा व लढ्ढा आदींची कुलस्वामिनी आहे. रविवार पेठेतील राठी वाड्यात श्री सच्चियाय मातेचे स्वयंभू असे जागृत स्थान आहे. गुढीपाडव्यापासुन देवीचे चैत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त अयोध्याबाई, ठमाबाई, व सुरजमल राठी यांचे स्मृर्ती प्रित्यर्थ श्रीमत देविभागवत कथेचे दि. २३ ते २९ मार्च कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ या दरम्यान ह.भ.प राजेंद्र महाराज तुपे यांच्या वाणीतुन भागवत निरुपण होणार आहे. सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संजय राठी व परिवाराने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा