संजय चव्हाण यांची स्विकृत संचालकपदी निवड !

संजय चव्हाण यांची स्विकृत संचालकपदी निवड !
नाशिक, न्यूज मसाला वृत्तसेवा::- नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या स्विकृत संचालकपदी आज संजय यादवराव चव्हाण यांची निवड झाली. 
"चव्हाणांच्या निवडीने संस्थेच्या तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव !" 

    चव्हाण हे बरेच वर्ष संंचालक होते. गत पंचवार्षिक मध्ये त्यांच्या पत्नी सौ. आशा चव्हाण या उपाध्यक्षा होत्या. चव्हाण हे जनलक्षमी बँकेचे माजी संंचांलक असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा फेडरेशनला व्हावा या उदात्त हेतुने आज फेडरेशनच्या संंचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या स्विकृत संचालकपदाला एकमुखाने मान्यता देण्यात आली.

अध्यक्ष प्रमोद भाबड यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी उपाध्यक्षा शर्मीला कुसारे, राजेंद्र भोसले, संपतराव सकाळे, शिवाजी रौंदळ, प्रमोद मुळाणे, सतीश सोमवंंशी, सुरेश भोेये, भारत कोकाटे, अमोल थोरेे, रोहीत पगार, ज्ञानेेश्वर लहाणे, सविता धनवटे, राजेंद्र गावीत, राजाभाऊ खेमनार, शशिकांत उबाळे, अर्जुन चुंंबळे, दिप्ती पाटील, कविता शिंदे, सचीव सुनील वारुंगसे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे