ब्रम्हकुमारी नारीशक्ती सन्मान २०२३ सोहळा संपन्न ! महिला मल्टी टास्किंग असतात- शर्मिष्ठा वालावलकर ! जिल्हा परिषदेच्या मंदाकिनी पवार व कविता देवरे-पवार यांना नारीशक्ती सन्मान !
ब्रम्हकुमारी नारीशक्ती सन्मान २०२३ सोहळा संपन्न !
महिला मल्टी टास्किंग असतात- शर्मिष्ठा वालावलकर !
जिल्हा परिषदेच्या मंदाकिनी पवार व कविता देवरे-पवार यांना नारीशक्ती सन्मान !
पंचवटी( न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक)::- भारतीय संस्कृती प्राचीन अविनाशी संस्कृती आहे, जितके भारतात देवी देवतांचे पूजन होते तितकी इतरत्र कुठे होत नाही. आपल्या आतील दैवी गुणांचे ते एक उत्प्रेरक आहे. दैवी संस्कारांना जागृत करणे म्हणजेच अध्यात्म होय. आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या आंतरिक गुणांच्या सुगंधाने प्रभावित केल्यास याचा फायदा फक्त आपल्यालाच न होता तो संपूर्ण विश्वाला होत असतो. असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी केले.
येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात साप्ताहिक नाशिक परिसर व ब्रह्मकुमारी संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्माकुमारी नारी शक्ती सन्मान २०२३ चे आयोजन दिनांक १० मार्च २०२३ रोजी समारंभ पूर्वक करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, माजी आरोग्य मंत्री शोभाताई बच्छाव, प्रादेशिक परिवहन खात्याचे उपप्रादेशिक अधिकारी सुखदेव भगत, पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे नगरसेविका वत्सलाताई खैरे, ब्रह्माकुमारी विनादीदी न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील,
दैनिक गावकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत, सौंदर्यवती शिल्पी अवस्ती, साप्ताहिक नाशिक परिसर चे संपादक दिलीप बोरसे आदी मान्यवर दीप प्रज्वलनासाठी उपस्थित होते.
दैनिक गावकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत, सौंदर्यवती शिल्पी अवस्ती, साप्ताहिक नाशिक परिसर चे संपादक दिलीप बोरसे आदी मान्यवर दीप प्रज्वलनासाठी उपस्थित होते.
प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले की स्त्री आणि पुरुष आपापल्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. स्त्री व पुरुषांचे आपापले गुणवैशिष्ट्य असतात मात्र यात स्त्रिया अधिक संवेदनशील असतात. संवेदनशील असावे मात्र इतरांच्या हातातील हत्यार होऊ नये. महिलांना अती रंजक संबोधन देण्यापेक्षा त्यांना माणूस म्हणून जगु द्या. महिला या मल्टी टास्किंग असतात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनेक संकटांवर मात करीत त्या जीवन जगत असतात मात्र त्यांचे हे जगणे संपूर्ण कुटुंबासाठी असते त्या नेहमीच कुटुंबासाठीच झटत असतात. मात्र त्यांनी अंतर्मनात डोकावून आपल्या खऱ्या इच्छा व आकांक्षा भागवल्या पाहिजे दुसरं कोणी येईल आणि आपल्याला मोठे करेल ही भावना महिलांनी त्यागली पाहिजे. स्वतःचे निर्णय स्वतः घेतली पाहिजे होते दुसऱ्यांना पटवून देता आले पाहिजे. असेही वालावलकर यांनी या प्रसंगी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रह्माकुमार ओंकार कडवे यांनी उपस्थित महिलांना भावना प्रद्र करणारे भावगीत गाऊन गाण्याला अनोखी दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पुष्पादीदी यांनी तर प्रास्ताविक ब्रह्माकुमार दिलीप बोरसे यांनी केले. कार्यक्रमात विविध महिला संघटनांच्या साधारणता ३० महिला पदाधिकाऱ्यांना ब्रह्माकुमारी संस्थेचा नारी शक्ती सन्मान २०२३ देऊन गौरविण्यात आले. यात अडवोकेट अश्विनी देशपांडे, सुरेखा रविंद्र पाटील, योगिता मालवी, जानकी पराग नाईक, सोनल दगडे, शिल्पा दरेकर, कविता सुनील कासलीवाल, संगीता अरुण पाटील, बबीता लोकेश शर्मा, मंदाकिनी पवार, चारुशीला देशमुख, ज्योती चव्हाण, के कीर्ती वर्मा, सोफिया कापडिया, मंदा फड, मेनू राजपूत, प्रज्ञा पाटील, वैशाली देवरे, कविता पवार, प्रभा मुंदडा, संगीता पेठकर, सुशीला काठे, आदी महिला पदाधिकाऱ्यांना ब्रह्माकुमारी संस्थेच्या मानाचा नारीशक्ती सन्मान २०२३ समारंभ पूर्वक ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ब्रह्माकुमारी नारीशक्ती पुरस्कारची शृंखला नाशिक जिल्ह्याच्या विविध सेवा केंद्र मधून चालूच आहे. याही पुढे मेरी म्हसरूळ येथील मुख्य सेवा केंद्र, सिडको राणे नगर सेवा केंद्र, नाशिक रोड सेवा केंद्र, येवला व कोपरगाव येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्र मधून सुद्धा नारी शक्ती सन्मान विविध क्षेत्रातील महिलांना घोषित झालेला आहे व वेगवेगळ्या दिवशी समारंभ पूर्वक हा सन्मान महिलांना प्रदान करण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा