अध्यक्ष पदी डॉ. विशाल गुंजाळ, उपाध्यक्ष पदी डॉ. मनिषा जगताप !आय एम ए नाशिकच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा !

अध्यक्ष पदी डॉ. विशाल गुंजाळ, उपाध्यक्ष पदी डॉ. मनिषा जगताप !
आय एम ए नाशिकच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा !
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801
 
        नाशिक ( प्रतिनिधी )::- इंडियन मेडिकल असोसिएशन - आयएमए ही देशातील डॉक्टरांची सर्वात जुनी व सर्वात मोठी संघटना आहे. नाशिकमधील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हास्तरीय शाखेला देखील जवळपास १०० वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे. आयएमए नाशिकच्या वर्ष २०२३ -२४ साठी नियोजित अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ यांचा ३१ मार्च  रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सोबतच डॉ. माधवी गोरे - मुठाळ या सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. या नूतन कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून डॉ. मनीषा जगताप, डॉ. भूषण नेमाडे, खजिनदार डॉ. पंकज भट, सहसचिव डॉ. सागर भालेराव, डॉ. प्रेरणा शिंदे, सह-खजिनदार डॉ. निलेश जेजुरकर, सांस्कृतिक सचिव पदी डॉ. मिलिंद भराडिया, क्रीडासचिव डॉ. सागर डुकळे, वुमन डॉक्टर्स विंगच्या चेअरपर्सनपदी डॉ. निकिता पाटील आणि नियोजित अध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांचा समावेश आहे.

   या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आयएमए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद कुमार अगरवाल उपस्थित राहणार आहेत. आयएमए चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, आ. डॉ. राहुल आहेर, आयएमए चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले व डॉ. शिवकुमार उत्तुरे, आयएमए महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. संतोष कदम यांच्या विशेष उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. येत्या वर्षभरात डॉक्टरांसाठी अभ्यासपूर्ण कार्यक्रम राबविण्यासोबतच युनायटेड वुई राईज या यंदाच्या ध्येय वाक्याला अनुसरून डॉक्टरांच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन, आपसांत सहकार्य वाढवून, सर्वांमध्ये एकता निर्माण करण्यासाठी नवीन कार्यकारणी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच डॉक्टरांच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील.
          ह्याशिवाय सर्वसामान्य जनतेसाठी  आरोग्यविषयक समस्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आयएमए व्याख्यानमाला, ग्रामीण भागातील १००० मुलींसाठी विनामूल्य हिमोग्लोबीन तपासणी शिबिरं आणि
 डब्ल्यूएचओ च्या २०२३ हेल्थ फॉर ऑल या संकल्पनेवर आधारित विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 
वैद्यकीय व्यवसाय करत असताना डॉक्टरांना अनेक प्रशासकीय आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यासाठी सरकार व प्रशासन यांच्याशी समन्वय साधणे आणि डॉक्टरांना सर्वतोपरी मदत करणे ही अत्यंत महत्त्वाची कामे हाताळण्याचा मानस असल्याचे नूतन अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ यांनी सांगितले.
वर्ष २०२२ - २३ या वर्षात विविध उत्तम उपक्रम राबविणाऱ्या कार्यकारिणीच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, सचिव डॉ. विशाल पवार, खजिनदार डॉ. माधवी गोरे मुठाळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, मावळत्या कार्यकारणीला निरोप देण्यासाठी व नूतन कार्यकारणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे