गॅस सिलेंडरच्या अपघातासाठी मुख्यतः निष्काळजीपणाच जबाबदार - केला
गॅस सिलेंडरच्या अपघातासाठी मुख्यतः निष्काळजीपणाच जबाबदार - केला
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801
नाशिक ( प्रतिनिधी ) ::- घरगुती किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर अत्यंत दक्षता घेऊन तयार केले जातात. त्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम, अटी व मानके यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. प्रत्येक सिलेंडरवर आवश्यक तो सर्व तपशील व सूचना स्पष्टपणे मुद्रित केलेल्या असतात. ग्राहकांनी देखील त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचे पालन आपल्याच सुरक्षेसाठी केले पाहिजे. सिलेंडरचा अपघात होण्यास मुख्यतः अयोग्य हाताळणी व निष्काळजीपणा जबाबदार असतो असे प्रतिपादन देशातील अग्रगण्य सिलेंडर निर्माते व उद्योजक किशोर केला यांनी केले.
पेठे विद्यालयातील १९७५ साली अकरावी उत्तीर्ण झालेल्या बॅचमधील तत्कालीन विद्यार्थ्यांनी आपले मित्र उद्योजक किशोर केला यांच्या गॅस सिलेंडर निर्मिती उद्योगाला नुकतीच स्नेहभेट दिली. सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सुपर टेक्नोफॅब प्रा. लि. या कंपनीत १९८६ मध्ये वार्षिक दहा हजार घरगुती गॅस सिलेंडरची निर्मिती केली जात होती.
३८ वर्षांपूर्वी किशोर केला यांनी व्यवसायात पदार्पण केले. आता त्यांनी आपले उद्योगविश्व ओम फॅबटेक प्रा. लि., सत्यसाई प्रेशर वेसल्स, सिद्धसाई प्रेशर कंटेनर्स व साईनाथ प्रेशर वेसल्स या एकूण ५ कारखान्यातून दरसाल २.५ दशलक्षाहून जास्त उत्पादन करण्याची क्षमता इतके विस्तारले आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरपासून औद्योगिक वापराचे व विविध क्षमतेचे सिलेंडर आज त्यांच्या कारखान्यात बनतात. गेल्या काही वर्षात त्यांनी उद्योगाचा विस्तार केला तो त्यांच्या जिद्द, चिकाटी व कल्पकतेतून ! त्याची प्रचिती या भेटीत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मित्रांना आली. येत्या काळात कमी वजनाचा नवा सिलेंडर ते बाजारात आणणार आहेत. त्याचा फायदा ग्राहक व उत्पादकांना होईल. या सिलेंडरमुळे देशाचे हजारो कोटी रूपये वाचवणार आहेत हे विशेष. एक चांगला कारखाना पहाता आला याचा सर्व मित्रांना आनंद झाला व अभिमान वाटला.

घरगुती वापरासाठी असणाऱ्या १४.२ किलो गॅस वजनाच्या सिलेंडर्सची निर्मिती सर्वाधिक होते. त्याशिवाय २ किलो वजनाच्या चिमुकल्या सिलेंडरपासून ४५० किलो गॅसच्या औद्योगिक वापराचे सिलेंडर येथे तयार होतात. ठराविक जाडीच्या लोखंडी पत्र्यापासून गोल कापून सुरुवात होऊन टप्प्याटप्प्याने विविध प्रक्रिया पार पाडत दोन व तीन जोडाचे अंतिम उत्पादन ऑर्डर देणाऱ्या कंपन्यांना पाठवले जाते. विविध टप्प्यांवर दर्जा नियंत्रण राखले जाते. ही सर्व प्रक्रिया किशोर यांचे पुत्र युवा उद्योजक सत्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपुलकीने प्रत्यक्ष दाखवली.नंतर कंपन्या रिकाम्या सिलेंडरमध्ये द्रवरूप गॅस भरतात असे त्यांनी सांगितले. एका सिलेंडरचे आयुष्य १० वर्षांचे असते. त्यामुळे कंपनीत जुने सिलेंडर्स देखील मोठ्या संख्येने दुरुस्तीसाठी येतात.
सुमारे ६०० कामगार दोन पाळ्यांमध्ये काम करतात. त्यात स्थानिकांची संख्या अधिक आहे. सिन्नर बरोबरच झारखंडच्या टाटानगरमध्ये साई सिलेंडर हा उद्योग आहे. तेथेही सिलेंडर्सचे उत्पादन केले जाते असेही किशोर केला यांनी नमूद केले. सौ. वंदना केला यांनी उपस्थितांचे आभार मानले. अखेरीस सुग्रास भोजनाने या स्नेहभेटीचा समारोप झाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा