पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

चांदवड (नासिक १७)::- आरोपी नारायण विश्वनाथ शिंदे. वय ४२ वर्षे, कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO), पंचायत समिती चांदवड, जि.नाशिक याने ५०००/- रुपये (पाच हजार) मागणी केली, तडजोडी अंती ४०००/- रूपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.


      यातील तक्रारदार यांचे वडिलांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचे गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करून  देण्याच्या कामाच्या मोबदल्यात  एकूण पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४०००/- रुपये लाचेची रक्कम  आज दिनांक १७ मार्च २०२३ रोजी कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सापळा अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, पोलीस उप अधीक्षक, सह सापळा अधिकारी - पो. नि. अनिल बागुल व सापळा पथक पो.ना. राजेश गीते, शरद हेंबाडे, अजय गरुड यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे