आयटी, साॅफ्टवेअर क्षेत्रात करिअर करण्यासाठी पायथाॅन भाषा आत्मसात करावी !संख्याशास्त्राचे ज्ञान हे विविध क्षेत्रात सहाय्यकारी व आवश्यक- ऋषिकेश जगताप !

आयटी, साॅफ्टवेअर क्षेत्रात करिअर करण्यासाठी पायथाॅन भाषा आत्मसात करावी !

संख्याशास्त्राचे ज्ञान हे विविध क्षेत्रात सहाय्यकारी व आवश्यक- ऋषिकेश जगताप !

पी.व्ही.पी. महाविद्यालयात संख्याशास्त्राचे अतिथी व्याख्यान
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801

कवठेमहांकाळ :  दि. २०  ( प्रतिनिधी)
येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील बी.एस्सी. संख्याशास्त्र  विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिथी व्याख्याते म्हणून   ऋषिकेश जगताप उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना  जगताप यांनी 'संख्याशास्त्रीय संकल्पना' तसेच  'सांख्यिकीय पद्धती आणि तंत्रांचा' वापर विविध प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये होत असल्याने आय टी इंडस्ट्री मध्ये संख्याशास्त्राची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.तसेच सध्या सर्वच ठिकाणी पायथाॅन (Python) या प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग अनिवार्य ठरत असल्याने संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी पायथाॅन भाषा आत्मसात केल्यास त्यांना विविध क्षेत्रात विशेषत: आयटी, साॅफ्टवेअर क्षेत्रात करिअर करण्यास मोठा वाव असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पायथाॅन विषयी मूलभूत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. 

 व्याख्यानानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या विविध शंकांचे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून निरसन करून घेतले. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एम. के. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना   बी.एस्सी. पदवी नंतर च्या  शिक्षणासाठी चे विविध पर्याय आणि संधी विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात तसेच विविध क्षेत्रातील पायथाॅन च्या   उपयुक्ततेची     माहिती व्हावी यासाठी हे व्याख्यान आयोजित केले असल्याचे सांगितले. 

याप्रसंगी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे   स्वागत पुस्तक आणि महाविद्यालयाचे वार्षिक 'वसंत'  देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. विजय कोष्टी यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. शीतल पाटील आणि प्रा. प्राजक्ता पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. गणेश सातपुते यांनी केले. सदर व्याख्यानासाठी  संख्याशास्त्र विषयाचे विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यान कार्यक्रमाचे नियोजन  शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष  बाळासाहेब शिंदे, सचिव  सुदर्शन शिंदे,  प्र. प्राचार्य डॉ. एम. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक विजय कोष्टी, सहायक प्रा. गणेश सातपुते, प्रा.शीतल पाटील आणि प्रा. प्राजक्ता पाटील यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे