अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची संधी : -बाळासाहेब सोनवणे !

अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची संधी : -बाळासाहेब सोनवणे !

डे केअरमध्ये विज्ञान दिनानिमित्त बालवैज्ञानिक क्रितिका व ऋतुजा यांचा सत्कार 


नाशिक : (प्रतिनिधी) डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनने स्पेस झोन इंडिया व डॉ. मार्टिन इन्स्टिटयूट यांच्या सहकार्याने पिको सॅटेलाइट पाच हजार मुलांनी विकसित केलेल्या 150 पिको सॅटेलाइटचे हायब्रीड रॉकेटचे यशस्वीरित्या तामीळनाडू येथून अवकाशात प्रक्षेपण केले. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचे सोने करावे, असे प्रतिपादन डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे यांनी केले.


 ज्ञानवर्धिनी  विद्याप्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, बालवैज्ञानिक मा.गि. दे.पाटील माध्यमिक विद्यालय, महिरावणी येथील क्रितिका खांडबहाले, कु. ऋतुजा काशीद, पालक विलास काशीद होते. वसंतराव एकबोटे सेवानिवृत्त मायको कर्मचारी व ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळाचे सचिव गोपाळराव पाटील आणि माध्यमिक  व उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य शरद गिते हे उपस्थित होते.

         यावेळी बोलताना बाळासाहेब सोनवणे पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील  क्रितिका व ऋतुजा या विद्यार्थिनींनी पुणे आणि पट्टीपलम (तामीळनाडू) येथे पीको सॅटेलाइट कार्यशाळेत मिळविलेल्या मागदर्शन आणि त्यांच्यातील चिकाटीच्या जोरावर पीको सॅटेलाइट बनविण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या. प्रयत्न, जिद्द व आत्मविश्‍वास असल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही, असे ते म्हणाले. विद्यार्थी मयंक निकम व अमृता उगले यांनी डॉ. सी.व्ही. रमन यांची माहिती व कार्य परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील ज्येष्ठ  विज्ञान शिक्षिका अनुजाताई पाठक यांनी केले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी हृदयाचं कार्य कसे चालते यावर आधारित ऍक्टिव्हिटी सादर केली. एन.सी.एस.सी. स्पर्धेमध्ये सहभागी शाळांतील  विज्ञान शिक्षकांचा व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. इ. ८ वीच्या विद्यार्थ्यांनी लोहमित्र धातू जिंदाबाद ही नाटिका सादर केली. शाळेतील माध्यमिक विभागातील विज्ञान शिक्षकांच्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विविध विज्ञान प्रकल्प व महाउर्जा क्लब अंतर्गत  भित्तिपत्रे, चित्रकला, वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा या  स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच वैज्ञानिक मॉडेल स्पर्धेतील विद्यार्थ्यांना देखील बक्षिसे देण्यात आली. क्रितिका खांडबहाले व ऋतुजा काशीद या विद्यार्थिनींनी  त्यांचा रॉकेट व सॅटेलाइट लॉचिंगचा प्रवास सांगितला. संस्थेचे सचिव गोपाळ पाटील यांनी आपल्या भाषणात यश मिळवणं सोपं असतं पण ते टिकवून ठेवणं कठीण असत. माणसाच्या दिसण्यावर जाऊ नये. ज्ञान कर्तृत्व हे जन्मतःच असते, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन लावण्या दीक्षित आणि लायबा खान  यांनी केले. आभार मुख्याध्यापक शरद गिते यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे