पूर्व प्राथमिक वयात मूल्यआधारित शिक्षण महत्वाचे - विनय जोशी
पूर्व प्राथमिक वयात मूल्यआधारित शिक्षण महत्वाचे - विनय जोशी
न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801
नाशिक( प्रतिनिधी )- मेंदूचा विकास हा वयाच्या पाच वर्षापर्यंत सुमारे ९० टक्के होतो. ही विकासाची वर्ष मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी खूप महत्त्वाची असतात. लहान मुलांचा मेंदू हा स्पंजसारखा असतो. या वयात ते जे काही बघतात ऐकतात किंवा अनुभवतात ते सगळे त्यांच्या मेंदूत समाविष्ट होते म्हणूनच या वयात मुलांनी चांगल्या गोष्टी शिकणं, ऐकणं आणि बघणं खूप महत्त्वाचं ठरतं.
यासाठीच आम्ही मूल्य शिक्षणावर भर दिला आहे. पूर्व प्राथमिक वयात जर मूल्यांवर आधारित शिक्षण दिलं गेलं तर मुलं त्या दृष्टीने तयार होतील आणि आपली संस्कृती जपण्यात याचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन इनोवेरा स्कूलचे सहसंस्थापक विनय जोशी यांनी केले.
याप्रसंगी संचालक विकास जकुने व शैक्षणिक समन्वयक प्राजक्ता पवार या उपस्थित होत्या. माय स्कूलची पहिली शाखा (इनोवेरा प्रि-स्कूल) लवकरच नाशिक शहरात सुरू होत असून त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की या वयात मुलांना अनुभवातून शिकवलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने शिकतात. इनोवेरा स्कूल हे शिक्षण क्षेत्रात मूल्यांवर आधारित शिक्षण देते. या संस्थेमध्ये लहान मुलांच्या अभ्यासक्रमावर संशोधन करून मुलांना शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबिल्या जातात. संस्थेकडे शिक्षण क्षेत्रातला बारा वर्षांपेक्षा अधिक अनुभव असून या अनुभवातून आणि संशोधनातून मल्टिपल इंटेलिजन्स या संकल्पनेवर आधारित आठ वेगवेगळ्या बुद्धिमत्तांवर मुलाचे निरीक्षण करण्यासाठी २८० वेगवेगळे निकष शोधले. जे हार्वर्ड गार्डनर च्या सिद्धांतावर आधारित आहेत. त्यानुसार जर शिकवले गेले तर मुलांच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण मिळेल आणि शिक्षणाची गोडी लागेल.असेही त्यांनी नमूद केले. जेव्हा मूल त्याच्या पद्धतीने शिकेल तेव्हा ते जास्त वेळासाठी त्याच्या लक्षात राहील. आम्ही जेव्हा ही पद्धती अवलंबिली तेव्हा आम्हाला मुलांमध्ये खूप सकारात्मक बदल दिसले. ही शिक्षण पद्धती पुण्याबाहेरच्या मुलांना पण फायद्याचे ठरावी या दृष्टीने आम्ही नाशिकमध्ये ती आणायचा विचार केला. पहिल्या टप्प्यामध्ये सात शाखा नाशिक मध्ये सुरू करायचे उद्दिष्ट असून यामुळे नाशिक मधील महिलांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील तसेच मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या पद्धतीत सुधारणा होईल आणि मुलं त्यांच्या आवडीनुसार शिकून अनेक क्षेत्रात यश मिळवू शकतील असेही जोशी यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा