भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

नासिक(न्यूज मसाला वृत्तसेवा::- बागलाण तालुक्यातील अंतापूर ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या स्वतःच्या अधिपत्याखाली करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

        अंतापूर येथील शेकड्याच्या वर ग्रामस्थांनी आपल्या सहीनिशी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. निवेदनात अठरा बाबतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.   सदर तक्रार अर्जात ग्रामपंचायत नूतन इमारत बांधकामातील अनियमितता, ग्रामपंचायत च्या शिल्लक रकमेत तफावत, गावातील अंतर्गत रस्त्यांचे काॅंक्रिटीकरण, प्लॅन इस्टिमेटनुसार भूमिगत गटार योजनेचे काम झालेले नाही, स्मशानभूमीतील पेव्हर ब्लॉक बसविणे, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करून आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा दावा, पाण्याच्या टाकी परिसरातील काॅंक्रिटीकरण, व्यायाम शाळा निकृष्ट बांधकाम, प्राथमिक शाळेतील कंपाऊंड, वाॅल कंपाऊंडचे अर्धवट झालेले काम, त्याचप्रमाणे अंगणवाडीतील खर्च, दलित वस्ती समाज मंदिर दुरुस्ती खर्च, शौचालय अनुदान वाटपात प्रत्यक्ष लाभार्थी वंचित आहेत अशा प्रकारची कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांची अफरातफर, आर्थिक अनियमितता झाली असल्याचे म्हटले आहे.
      या प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून करण्याचे आश्वासन आशिमा मित्तल यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. सदर निवेदन आज सरकारी कर्मचारी संपामुळे स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्विकारले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे