जिल्हाभरात 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' जनजागृती अभियानाला सुरवात !
जिल्हाभरात 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' जनजागृती अभियानाला सुरवात !
१ ते ८ मार्च दरम्यान चित्ररथ आणि पथनाट्यातून होणार जनजागृती !
नाशिक : जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांना महिला दिनानिमित्त जनजागृती अभियान राबविण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हाभरात मुलगी वाचवा, मुलगी शिकवा (बेटी बचाव, बेटी पढाओ) अभियान राबवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्य विभागास दिले होते त्यानुसार "मुलगी वाचवा, मुलगी शिकवा" अभियानाला (बेटी बचाव, बेटी पढाओ) झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
या माध्यमातून दि.०१ मार्च ते ०८ मार्च महिला दिनापर्यंत जिल्ह्यात आरोग्य विभाग व अण्णाभाऊ साठे बहुद्देशीय सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चित्ररथ आणि पथनाट्याद्वारे जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवत शुभेच्छा दिल्या. पथनाट्य समूहाने जिल्हा परिषद आवारात अधिकारी व कर्मचारी यांच्यासमोर पथनाट्याचे सादरीकरण करत मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, गर्भलिंग निदान चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे आहे असा संदेश दिला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आनंदराव पिंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) दीपक चाटे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा