शोभा नाखऱे लिखित दिव्यभरारी पुस्तक आता क्यूआर कोडमध्ये देखील उपलब्ध !

शोभा नाखऱे लिखित दिव्यभरारी पुस्तक आता क्यूआर कोडमध्ये देखील उपलब्ध !

        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिव्यांगांसाठी शिक्षणदानाचे कार्य केलेल्या शिक्षिका आणि राष्ट्रपती पदक विजेत्या शोभा नाखरे यांच्या दिव्य भरारी या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून ते वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर देश-विदेशातील वाचकांना ते सहजरित्या वाचनासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी ते क्यूआर कोड स्वरुपातदेखील उपलब्ध करण्यात आले आहे.

अशाप्रकारचा हा साहित्य क्षेत्रातील किंबहुना पहिलाच उपक्रम आहे. क्यूआर कोड स्कॅन करून वाचकांना या पुस्तकाच्या वाचनाचा आनंद मोबाईल, संगणक आदींवर सहजरित्या मिळू शकणार आहे. 
दिव्य भरारी या पुस्तकात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून समाजापुढे आदर्श निर्माण केलेल्या दिव्यांग व्यक्तींचे प्रेरणादायी लेख समाविष्ट कऱण्यात आले आहेत. पुस्तकाला ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती रेणूताई गावस्कर यांची प्रस्तावना आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !