नॅशनल एंटरप्राईजेस यांच्या वतीने कर्ज योजनांवर मार्गदर्शन शिबिर !

 नॅशनल एंटरप्राईजेस यांच्या वतीने कर्ज योजनांवर मार्गदर्शन शिबिर !
  
 नाशिक::-  येथे शिवजयंती निमित्त नॅशनल एंटरप्राईजेस यांच्या वतीने आर्थिक साक्षरता व केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कर्ज योजनांवर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
        शिवजयंती निमित्त एक स्तुत्य उपक्रम म्हणून बेरोजगार, सुशिक्षित, महिला वर्ग, शेतकरी, कामगार, व्यापारी, फेरीवाले, छोटे व्यावसाईक यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच विविध महामंडळच्या कर्ज योजनांच्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरू करणे व सुरू असलेले व्यवसाय वृद्धिंगत करणे, शेतकरी व शेतकरी पुत्रांनी शेती व शेतीसोबत जोड व्यवसाय सुरू करणेसाठी असलेल्या कर्ज योजना, या सर्व योजनांच्या माध्यमातून मिळणारे अनुदानाबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन महेंद्र रोकडे, (से. नि. प्रबंधक, एसबीआय) यांनी दिले.                                             

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते  पुरुषोत्तम वाणी, सौ. शोभाताई काळे,  बाळासाहेब सांगळे, महेंद्र हिरे, मोहन जगताप,  रवी गायकवाड, शरद शिंदे, राजू कुमावत, श्याम गोसावी,  समाधान बागल, चकोर, हारून शेख आदि उपस्थित होते. 

                                             या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, डॉ. अरुण पवार (ACS), वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. रोहन बोरसे, डॉ.पाटील,  पुंजाबई बोडके, प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तूभाउ बोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बैरागी यांनी केले. 
आभार नॅशनल एंटरप्राईजेसचे संचालक विजय कापडणीस यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !