“भारत देश मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हृदयरोग या आजारांची राजधानी बनू पहात आहे.”- डॉ. उज्ज्वल कापडणीस

“भारत देश मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हृदयरोग या आजारांची राजधानी बनू पहात आहे.”- डॉ. उज्ज्वल कापडणीस 
 
      नासिक (सुचेता बच्छाव)::- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विद्यालय, गंगापुर रोड च्या संचालिका मनीषा दीदी यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवात ध्रुवनगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. कापडणीस आणि सहकाऱ्यांनी  मधुमेह, हृदयरोग आणि ब्लड प्रेशर या आजारां बद्दल  माहिती देऊन मार्गदर्शन केले. 


    डॉ. कापडणीस यांनी या सर्व आजारांचे मूळ आपल्या बदललेल्या जीवनशैलीत आहे असे सांगितले, शारीरिक हालचालींचा आभाव, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी  , प्रचंड ताणतणाव , बैठी जीवनशैली, रासायनिक कीटक नाशकांचा शेतीत केला जाणार प्रचंड वापर यांमुळे हे आजार उधभवतात. काही वेळी या आजारांना अनुवंशिकता ही कारणीभूत असते असेही ते म्हणाले. 
या आजरांपासून सुटका होण्यासाठी लोकांनी आहारात बदल, विविध शारीरिक व्यायाम , नियमित शारीरिक तपासणी, दिलेल्या औषधांचे नियमित सेवन, ताणतणावांचे व्यवस्थापन, ध्यानधारणा करणे अशा प्रकारचे उपाय करणे आवश्यक आहे असे डॉ. कापडणीस यांनी सुचवले. त्याच बरोबर त्यांनी ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या माध्यमातून ध्यानधारणा व राजयोगचा अभ्यास करावा असेही आवाहन केले. या प्रसंगी म्यूजिकल योगा चे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले ज्यात नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला. डॉ.मनिषा कापडणीस यांनी मेडीटेशन कसे करावे याची अनुभुती दिली. संस्थेच्या संचालिका मनिषा दिदी यांनी सकारात्मक विचार आणि त्यांचा शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. परिसरातील  नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोफत आरोग्य शिबिरात उत्साहाने सहभाग नोंदविला.
#sucheta bachhav #manisha kapadnis #kapadnis #meditation

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !